पुणे जिल्ह्यात एक लाख हेक्टर क्षेत्र नापेर
पुणे जिल्ह्यात एक लाख हेक्टर क्षेत्र नापेर 
मुख्य बातम्या

पुणे जिल्ह्यात एक लाख हेक्टर क्षेत्र नापेर

टीम अॅग्रोवन

पुणे ः यंदा खरीप हंगामात पावसाने चांगलीच ओढ दिल्याने पुरेशा प्रमाणात पेरण्या झालेल्या नाहीत. अजूनही पुणे जिल्ह्यातील पूर्व भागात पुरेसा पाऊस झालेला नाही. त्याचा परिणाम खरीप हंगामातील पेरणीवर झाला आहे. जिल्ह्यात पावसाअभावी एक लाख सात हजार ७३९ हेक्टर नापेर राहिल्याचे चित्र आहे. त्यामुळे खरीप उत्पादनात मोठी येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.    

चालू वर्षी हवामान विभागाने चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार शेतकऱ्यांनी खरिपाचे नियोजन केले होते. मात्र, पाऊस उशिराने दाखल झाल्याने पुरेशा प्रमाणात पेरण्या झाल्या नाहीत. पूर्व भागात अजूनही दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे उपलब्ध पाण्यावर शेतकर्यांनी खरिपाच्या पेरण्या केल्या आहेत. सध्या अनेक ठिकाणी पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. आत्तापर्यत सरासरीच्या दोन लाख ३० हजार ८२६ हेक्टरपैकी एक लाख २३ हजार ८७ हेक्टर म्हणजेच ५३ 

टक्के पेरणी झाली. काही तालुक्यांत कमी पाऊस झाल्याने पेरणीचे प्रमाण कमी आहे. पिकांसाठी पावसाची अत्यंत आवश्यकता आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. 

पश्चिम भागातील उशिराने दाखल झालेल्या पावसामुळे विभागात उशिराने भात लागवडी सुरू झाल्या आहेत. या भागातील भोर, वेल्हा, मुळशी, मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर या तालुक्यांच्या पश्चिम भागात सुमारे ३८ हजार २३४ हेक्टरवर भाताची पुनर्लागवड झाली आहे. तर  ३४ हजार ७१९ हेक्टर क्षेत्र अजूनही भात लागवडीपासून दूर आहे. चाऱ्यासाठी अनेक शेतकरी मक्याची पेरणी करतात. यंदा त्यातही चाळीस टक्क्यांनी घट झाली असून अवघ्या सहा हजार ६२७ हेक्टरवर पेरणी झाली आहे. 

बाजरीचे सरासरी ४४ हजार ९४ हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी अवघ्या ३० हजार ६७३ हेक्टरवर पेरणी झाली आहे. तर बाजरीचे अजूनही १३ हजार ४२१ हेक्टर क्षेत्र पेरणीपासून वंचित असल्याचे दिसून येते.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT