सोलापुरात ‘एनटीपीसी’ उभारणार २३ मेगावॉटचा सौरऊर्जा प्रकल्प
सोलापुरात ‘एनटीपीसी’ उभारणार २३ मेगावॉटचा सौरऊर्जा प्रकल्प 
मुख्य बातम्या

सोलापुरात ‘एनटीपीसी’ उभारणार २३ मेगावॉटचा सौरऊर्जा प्रकल्प

टीम अॅग्रोवन

सोलापूर : सोलापुरातील राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा प्रकल्पाच्या (एनटीपीसी) वतीने २३ मेगावॉट क्षमतेचा सौरऊर्जा निर्मितीचा प्रकल्प उभारला जाणार आहे. हा प्रकल्प या वर्षीच डिसेंबरअखेरीस पूर्ण होणार आहे. त्याशिवाय आणखी ४० मेगावॉटची निर्मिती पुढील वर्षीपर्यंत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. विजेची मागणी वाढल्याने सौरऊर्जा प्रकल्पनिर्मितीच्या कामाला वेग देण्यात आल्याचे सांगण्यात आले. लॉकडाउनच्या काळातही ‘एनटीपीसी’ प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू होता. आता दिवाळीतही विजेची मोठी मागणी होणार असल्याने वीजनिर्मितीसह सौरऊर्जा प्रकल्पाला गती देण्यात येत आहे. वीजनिर्मितीवेळी सल्फर डायऑक्साइडची मात्रा कमी करण्यासाठी एफजीडी प्रणाली या नव्या तंत्रज्ञान प्रकल्पाची उभारणी करण्यात येत आहे. यासाठी दोन चिमण्यांची उभारणी करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे पहिले युनिट २०२१ पर्यंत सुरू होईल. तर दुसरे युनिट दीड वर्षात पूर्ण होईल. या दोन्ही प्रकल्पांमुळे पर्यावरणपूरक वातावरण निर्माण होईल, तसेच हवेत उडणाऱ्या राखेचे प्रमाणही शून्य राहणार असल्याचे एनटीपीसीकडून सांगण्यात आले. कोळशाची उपलब्धता,उत्पादन खर्च झाला कमी एनटीपीसीच्या प्रकल्पातील वीजनिर्मितीसाठी सोलापूरपासून दीड हजार किलोमीटरवरून ओडिशा राज्यातून कोळसा आणला जात होता. पण गेल्या सहा महिन्यांपासून तेलंगणा येथील सिंगारेनी कोलरिज कंपनी लिमिटेड या कंपनीकडून कोळसा उपलब्ध झाल्याने प्रति युनिटमागे एक रुपया उत्पादन खर्च कमी झाला आहे. त्यामुळे पूर्वी प्रतियुनिटला ३ रुपये ८० पैसे येणारा खर्च आता २ रुपये ८० पैशांवर आला आहे. साहजिकच, विजेच्या कमी दरामुळे एनटीपीसीच्या विजेला मागणी वाढल्याचे एनटीपीसीचे सरव्यवस्थापक नामदेव उप्पर यांनी सांगितले.

परराज्यांना वीजपुरवठा सोलापूरच्या प्रकल्पातून ६०० मेगावॉटहून अधिक वीजनिर्मिती होते. या प्रकल्पातील वीज सध्या महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, छत्तीसगड, गोवा, दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली या राज्यांना पुरविली जाते. येत्या काळात ही क्षमता आणखी वाढवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच सौरऊर्जा प्रकल्पांमुळेही एनटीपीसी अतिरिक्त वीज उत्पादन करणार असल्याने विजेची मुबलक उपलब्धता होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT