Now look at the selection of the chairperson in Dhule Zilla Parishad
Now look at the selection of the chairperson in Dhule Zilla Parishad 
मुख्य बातम्या

धुळे जिल्हा परिषदेत आता सभापती निवडीकडे लक्ष

टीम अॅग्रोवन

धुळे ः अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीनंतर जिल्हा परिषदेतील विषय समित्यांच्या सभापती निवडीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. येत्या पंधरा दिवसांच्या आत या पदांसाठी निवड प्रक्रिया राबविली जाईल. बहुमताने भाजपची सत्ता स्थापन झाल्याने बापू खलाणे, मंगला पाटील, मोगरा पाडवी यांना सभापतिपदाची संधी असून, धुळे तालुक्‍यातील प्रा. अरविंद जाधव, धरती देवरे, राम भदाणे यांच्यातही चुरस असेल.

जिल्हा परिषदेत चार विषय समित्यांसाठी निवड प्रक्रिया राबविली जाईल. त्यात समाजकल्याण, शिक्षण व आरोग्य, कृषी व पशुसंवर्धन, महिला व बालविकास समिती सभापतींची निवड केली जाईल. समाजकल्याण समितीच्या सभापतिपदासाठी शिरपूर तालुक्‍यातील मोगरा जयवंत पाडवी, कृषी व पशुसंवर्धन सभापतिपदासाठी धुळे तालुक्‍यातील बापू खलाणे, महिला व बालकल्याण समितीसाठी साक्री तालुक्‍यातील मंगला पाटील यांना संधी मिळू शकते. शिक्षण व आरोग्य समिती सभापतिपदासाठी धुळे तालुक्‍यातील प्रा. जाधव, सौ. देवरे, श्री. भदाणे यांच्यात चुरस दिसू शकेल. तसेच, भाजपचे नेते समाजकल्याण समिती वगळता इतर समित्यांवरील सभापती निवडीच्या नावांमध्ये ऐनवेळी अदलाबदल करू शकतात. 

शिरपूर तालुक्‍याला अध्यक्षपद, शिंदखेडा तालुक्‍याला उपाध्यक्षपद बहाल झाले आहे. त्यामुळे धुळे तालुक्‍याला दोन, तर साक्री व शिरपूर तालुक्‍याला प्रत्येकी एक सभापतिपद दिले जाणार आहे. शिरपूर तालुक्‍यातून अनुसूचित जाती, जमातीचे सर्वाधिक दहा सदस्य निवडून आल्याने या तालुक्‍याला समाजकल्याण समितीचे सभापतिपद दिले जावे, अशी पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून सूचना आहे. 

अध्यक्षपद मिळावे म्हणून भाजपच्या स्थानिक व वरिष्ठ सर्व प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी करून आलेले श्री. खलाणे यांना कृषी व पशुसंवर्धन सभापतिपद दिले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. शिवाय, मंगला पाटील यांना महिला व बालकल्याण समिती सभापतिपद दिले जाईल. उर्वरित शिक्षण व आरोग्य समिती सभापतिपदासाठी धुळे तालुक्‍यातील तीन सदस्यांमध्ये रस्सीखेच होण्याची शक्‍यता असेल. भाजपचे नेते नेमका काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष असेल. 

निकम यांच्याकडे अर्थ व बांधकाम समिती  जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित उपाध्यक्षा कुसुमताई कामराज निकम यांच्याकडे अर्थ, नियोजन व बांधकाम समितीचे सभापतिपद राहणार असल्याचे रावल गटाकडून सांगण्यात आले. त्याविषयी भाजपचे निवडणूक प्रभारी तथा आमदार जयकुमार रावल, अमरीशभाई पटेल, डॉ. सुभाष भामरे यांच्यात एकमत झाल्याचेही रावल गटाने सांगितले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande : शहाणे करून सोडले, सकळ जण...

Govind Hande : अविरत कर्मयोगी

Wheat Market : विदर्भात गव्हाच्या दरात चढ-उतार

Cotton Productivity : परभणी जिल्ह्यात कापूस रुईचा उतारा हेक्टरी ३ क्विंटल ९८ किलो

Water Scarcity : करकंब परिसरात द्राक्षबागांना टँकरने पाणी

SCROLL FOR NEXT