‘नामको’चा प्रचार शिगेला, निवडणूक चार दिवसांवर
‘नामको’चा प्रचार शिगेला, निवडणूक चार दिवसांवर 
मुख्य बातम्या

‘नामको’चा प्रचार शिगेला, निवडणूक चार दिवसांवर

टीम अॅग्रोवन

नाशिक : सहकार क्षेत्रातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या नाशिक मर्चंट को-आॅप. बॅँकेच्या निवडणुकीसाठी अवघे चार दिवस शिल्लक आहेत. तिन्ही पॅनेलचा प्रचार शिगेला पोचला आहे. येत्या रविवारी (ता.२३) बॅँकेची निवडणूक होत असल्याने सर्व मतदारांपर्यंत पोचण्यासाठी सर्वच पॅनेलची दमछाक होत आहे. त्यामुळे पारंपरिक प्रचाराबरोबरच सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असून, ध्वनिफितचादेखील वापर होत आहे. 

 नाशिक मर्चंट बॅँकेची निवडणूक यंदा निर्णायक वळणावर आहे. वर्षानुवर्षे (कै.) हुकूमचंद बागमार यांच्या अधिपत्याखाली असलेली बॅँक आता सभासद कोणाच्या हाती सोपवणार हा उत्कंठेचा विषय आहे. बागमार यांचे सुपुत्र अजित बागमार यांनी नम्रता पॅनेलवर दावा सांगितला. त्यानंतर अनेक वर्षे सत्तेत असलेल्या माजी संचालकांनी प्रगती पॅनेल स्थापन केला. पारंपरिक सहकार पॅनेलही विरोधात कंबर कसून उभा आहे. तिन्ही पॅनेल जोमाने प्रचार करीत असून, सुरवातीला व्यापारपेठांवर लक्ष केंद्रित केले होते. परंतु आता अन्य सभासदांवरदेखील लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यासाठी घरभेटींवर भर दिला जात आहे. ग्रामीण भागातील आप्तेष्ट आणि नातेवाइकांच्या माध्यमातून प्रचार केला जात आहे. बॅँकेचे बहुराज्यीय कार्यक्षेत्र असल्याने समाज माध्यमांचा अत्यंत प्रभावीपणे वापर होत आहे. 

लग्नसोहळे ठरले प्रचारात पर्वणी सध्या लग्नसराई सुरू झाल्याने प्रचारासाठी ते उत्तम माध्यम ठरले आहे. लग्न सोहळ्यांसह अन्य कार्यक्रमांत प्रचार सुरू आहे. भेट  वस्तूंच्या आकाराची व्यक्तिगत प्रचार पत्रके तयार करण्यात आली आहेत. त्याद्वारे वेगाने प्रचार सुरू आहे. अशा सोहळ्यात नातवाइकांना सांगा, असे आवाहनही केले जात आहे. विशेष म्हणजे कार्यकर्त्यांबरोबरच नातेवाइकही प्रचाराला जुंपले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT