बाजार समिती निवडणुकीत खर्चाची मर्यादा नाही
बाजार समिती निवडणुकीत खर्चाची मर्यादा नाही 
मुख्य बातम्या

बाजार समिती निवडणुकीत खर्चाची मर्यादा नाही

टीम अॅग्रोवन

सोलापूर  : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी शेतकऱ्यांना मतदानाचा हक्क देण्यात आला आहे. शेतकऱ्यांना मतदानाचा हक्क मिळाल्यानंतर नाशिक, सोलापूर व बार्शी बाजार समितीची निवडणूक या नवीन कायद्याप्रमाणे होत आहे. या निवडणुकीसाठी मतदानासाठी मतदारांना ‘नोटा’चा पर्याय देण्यात आला नाही. तसेच उमेदवारांनी निवडणुकीवर किती खर्च करावा, याचीही मर्यादा घालून देण्यात आलेली नाही.  राज्य निवडणूक आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या निवडणुकांमध्ये असणारे प्रमुख नियम बाजार समितीच्या निवडणुकीत दिसत नाही. दोन अपत्ये, स्वच्छतागृह याही अटी बाजार समिती निवडणुकीसाठी नाहीत. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या वतीने १५ मुद्द्यावर आधारित निवडणूक नियमावली आखून देण्यात आली आहे. या नियमावलीच्या माध्यमातून बाजार समितीच्या आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याची सूचना प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आली आहे. मतदानाच्या २४ तास अगोदर जाहिरात व प्रचाराला बंदी घालण्यात आली आहे. बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी निवडणूक प्रक्रियेत प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभागी होऊ नये, बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात बाजार समितीच्या खर्चाने झालेल्या विकासकामांचे उद्‌घाटन, भूमिपूजन करता येणार नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT