No increase in fertilizer prices 
मुख्य बातम्या

खतांची दरवाढ नाही

रासायनिक खतांच्या किमतींमध्ये कोणत्याही प्रकारची दरवाढ करण्यास मान्यता देण्यात आलेली नाही, असे केंद्र सरकारने आज (ता. ९) स्पष्ट केले.

टीम अॅग्रोवन

पुणे : रासायनिक खतांच्या किमतींमध्ये कोणत्याही प्रकारची दरवाढ करण्यास मान्यता देण्यात आलेली नाही, असे केंद्र सरकारने आज (ता. ९) स्पष्ट केले.

काही खत उत्पादक कंपन्यांनी दरवाढ केल्याच्या बातम्या विविध माध्यमांमधून प्रसारित झाल्यानंतर केंद्र शासनाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. केंद्रीय रसायने व खते विभागाचे राज्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी खत उत्पादकांसोबत बैठक घेतल्यानंतर पत्रकारांना सांगितले, की सध्याच्या स्थितीत कोणत्याही रासायनिक खताच्या दरात वाढ न करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

‘इफ्को’चे विपणन संचालक योगेंद्र कुमार यांनी राज्यस्तरीय कार्यालयांना पाठविलेल्या पत्रात डीएपीची ५० किलोची गोणी १९०० रुपयांना राहील, असे म्हटले होते. तसेच या पत्रात २०:२०:०:१३ या ग्रेडची किंमत १३५० रुपये, तर १५:१५:१५ ग्रेडचा दर १५०० रुपये ठेवण्यात आला होता. ‘‘आमच्या प्रशासकीय कामकाजातील हे पत्र आहे. या सुधारित दराचा शेतकरी वर्गासाठी उपलब्ध असलेल्या दराशी संबंध नाही,’’ असा दावा इफ्कोने केला आहे.

इफ्कोच्या म्हणण्यानुसार, ‘‘खतांच्या प्रसारित झालेल्या बातम्यांमध्ये दरवाढीचा उल्लेख केलेला आहे. मात्र हे दर पुढील काही महिन्यांची स्थिती विचारात घेत गोदामांमध्ये साठवणुकीसाठी होणाऱ्या खतांच्या बाबतीतील आहेत.

शेतकऱ्यांना विकल्या जाणाऱ्या सध्याच्या खतांबाबत नव्या दराचा संबंध नाही. शेतकऱ्यांसाठी विक्रीकरिता उपलब्ध होणाऱ्या नव्या मालाचे दर अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत. जुना खतसाठा बाजारात उपलब्ध असून, तो जुन्या दरानेच विक्री करण्यात येईल.’’ खतांच्या विक्रीबाबत इफ्कोच्या मुख्यालयाने देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘‘११.२६ लाख टन संयुक्त खते ही शेतकऱ्यांना जुन्या दराने दिली जाणार आहेत. नवे दर शेतकऱ्यांसाठी लागू करण्यात आलेले नाहीत,’’ असे मुख्यालयाने म्हटले आहे.

शेतकऱ्यांसाठी खते दरवाढ नाही ः इफ्को बाजारपेठेत शेतकऱ्यांसाठी असलेल्या विक्रीच्या दरात अद्याप कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही, अशी माहिती इंडियन फार्मर्स फर्टिलायझर्स को-ऑपरेटिव्ह लिमिटेडच्या (इफ्को) सूत्रांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update: उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता; राज्यातील काही भागात शुक्रवारी आणि शनिवारी पावसाचा अंदाज

Khandesh Rain Damage: खानदेशात पावसाने १८ हजार हेक्टरला फटका

Maize Procurement Issue: बाजारात मका दर हमीभावापेक्षा कमी

Farm Subsidy Delayed: कृषी यांत्रिकीकरणाच्या अनुदानाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

Mango Crop Compensation: आंबा उत्पादकांना नुकसान भरपाई मंजूर करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT