Need for scientific breeding of native cattle: Dr. To drop 
मुख्य बातम्या

देशी गोवंशाची शास्त्रीय पद्धतीने संवर्धनाची गरज ः डॉ. मुकणे

पुणे ः ‘‘प्रयोगशील पशुपालकांच्या सहयोगाने राज्यात देशी गोवंश संवर्धनाची चळवळ वाढत आहे. या संवर्धनाला शास्त्रीय पद्धतीची जोड द्यावी लागेल. पशुपालक, पशुसंवर्धन विभाग आणि कृषी विद्यापीठांनी एकत्रित काम केले, तर निश्‍चितपणे देशी गोवंश संवर्धनाला योग्य दिशा मिळेल,’’ असे मत जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. शीतलकुमार मुकणे यांनीव्यक्त केले.

टीम अॅग्रोवन

पुणे ः ‘‘प्रयोगशील पशुपालकांच्या सहयोगाने राज्यात देशी गोवंश संवर्धनाची चळवळ वाढत आहे. या संवर्धनाला शास्त्रीय पद्धतीची जोड द्यावी लागेल. पशुपालक, पशुसंवर्धन विभाग आणि कृषी विद्यापीठांनी एकत्रित काम केले, तर निश्‍चितपणे देशी गोवंश संवर्धनाला योग्य दिशा मिळेल,’’ असे मत जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. शीतलकुमार मुकणे यांनी व्यक्त केले.

‘साहिवाल क्लब''च्या सहाव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात डॉ. मुकणे यांनी पशुपालकांना सविस्तर मार्गदर्शन केले. साहिवाल क्लब, गौ-अर्थ संवर्धन व संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने देवकरवाडी फाटा (जि. पुणे) येथील बाफना फार्ममध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी साहिवाल क्लबचे अध्यक्ष संतोष राऊत, गौ-अर्थ संस्थेचे अध्यक्ष रवींद्र लाड, डॉ. सोमनाथ माने, डॉ. धीरज कणखरे, प्रकाश बाफना, यशवंत खैरे आदी उपस्थित होते.

पशुपालकांना मार्गदर्शन करताना डॉ. शीतलकुमार मुकणे म्हणाले, ‘‘राज्यातील देशी गोवंशामध्ये विविधता आहे. विभाग आणि गरजेनुसार त्यांचे संवर्धन आवश्यक आहे. प्रत्येक पशुपालकाने जातिवंत जनावरांची शास्त्रीय पद्धतीने नोंद ठेवावी. जातिवंत पैदाशीसाठी भ्रूण प्रत्यारोपण, लिंग निर्धारित रेतमात्रा या सुधारित तंत्राचा देखील अवलंब करावा. जातिवंत पैदास ही काळाची गरज आहे. यातूनच देशी गोवंशाची शुद्धता आणि उत्पादकता वाढविण्यास मदत मिळेल.’’ 

जातिवंत गोसंवर्धनातील कार्य लक्षात घेऊन या कार्यक्रमामध्ये विजय ताकवणे-पाटील (पारगाव, जि. पुणे), सुदीप तंगडी (जत, जि. सांगली), गुलाब भिलारे (वालूथ, जि. सातारा), संजय तावरे (सांगवी, जि. पुणे), डॉ. धीरज कणखरे (कृषी महाविद्यालय, पुणे) कु. राजवीर लाड (कुंडल, जि. सांगली) यांचा सत्कार करण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT