On the nearby gram crop Infestation of ghat larvae 
मुख्य बातम्या

जेवळीत हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव

जेवळी, जि. उस्मानाबाद : यंदा पाऊस काळ जास्त झाल्याने रब्बी पिकावर रोगाचा प्रादुर्भाव अधिक दिसून येत आहे. तूर, ज्वारी पिकानंतर आता हरभऱ्या पिकावरही घाटे अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे.

टीम अॅग्रोवन

जेवळी, जि. उस्मानाबाद : यंदा पाऊस काळ जास्त झाल्याने रब्बी पिकावर रोगाचा प्रादुर्भाव अधिक दिसून येत आहे. तूर, ज्वारी पिकानंतर आता हरभऱ्या पिकावरही घाटे अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. 

यंदा पावसाळ्यात सुरुवातीचे तीन महिने पावसाने दगा दिला. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांची वाढ खुंटली. यातही अनेक शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा नियोजन करत पिके जगविली. ऐन काढणीच्या वेळेस नको असताना पाऊस बरसला. हाता- तोंडाला आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

शेवटच्या टप्प्यात झालेल्या या अतिवृष्टीने बहुतांश पिके हातची गेली. खरीप हंगाम वाया गेला, तरी पाण्याच्या उपलब्धतेवर रब्बी हंगाम साथ देईल, अशी अपेक्षा होती. परंतु लांबत गेलेल्या पावसाळ्यामुळे वातावरणातील व जमिनीतील ओलावा तसेच अधून- मधून ढगाळ हवामानामुळे यंदा रब्बी पिकावर रोगाचा प्रादुर्भाव अधिक झाल्याचे दिसून येत आहे. 

तूर, ज्वारीवर किडीच्या प्रादुर्भावानंतर आता हरभऱ्यावरही मोठ्या प्रमाणात घाटी आळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. शिवारात हरभरा पिकांच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जमिनीतील चांगल्या ओलाव्यामुळे शिवारात हरभरा बहरला आहे. मोठ्या प्रमाणात फळधारणा झाली आहे. परंतु आता सर्वत्र घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. ही अळी घाट्यात शिरून दाणे खात आहे. प्रादुर्भावामुळे हरभरा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. सध्या हरभरा पिकावरील किडे खाण्यासाठी शिवारात पक्षाचे थवे भिरभिरत आहेत. अळी नियंत्रणासाठी शेतकरी कीटकनाशकांची फवारणी करीत आहेत.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT