नाशिकमध्ये २३ मेपर्यंत  कडक लॉकडाऊन In Nashik till 23rd May Strict lockdown
नाशिकमध्ये २३ मेपर्यंत  कडक लॉकडाऊन In Nashik till 23rd May Strict lockdown 
मुख्य बातम्या

नाशिकमध्ये २३ मेपर्यंत  कडक लॉकडाऊन

टीम अॅग्रोवन

नाशिक : जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या अंशत: लॉकडाउनमुळे काही प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होत आहे. परंतु गेल्या तीन चार दिवसांपासून बाधितांची संख्या एका विशिष्ट मर्यादेला स्थिर झाली आहे. ही बांधितांची संख्या पूर्णत: कमी करण्यासाठी कठोर निर्णय घेऊन १२ मे दुपारी १२ वाजेपासून २३ मेपर्यंत जिल्ह्यात कडक लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. या कडक लॉकडाउनच्या काळात जनतेच्या पूर्ण सहकार्याने कोरोना विरूद्धची जिंकण्याचा विश्वास पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.

या बाबत माहिती देताना पालकमंत्री भुजबळ म्हणाले, ‘‘रुग्णसंख्या कमी करण्यासाठी जिल्ह्यात १२ मेपासून १० दिवसांचा कडक लॉकडाउन जाहीर करण्यात येत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेतील कोरोना बाधितांच्या संख्यापेक्षा आताच्या परिस्थितीत बाधितांची संख्येत वाढ झाली आहे. यावर उपाय म्हणून राज्यात व जिल्ह्यात अंशत: कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या काळात अनेक कारखानदार, बांधकाम व्यावसायिक यांनी तेथे काम करणाऱ्या कामगारांची तेथेच व्यवस्था करून त्यांच्या लसीकरणाची देखील सोय करण्यात यावी, असे भुजबळ यांनी कारखान्यांचे मालक व बांधकाम व्यावसायिक यांना सूचित केले आहे.

लॉकडाउनच्या कालावधीत शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाचे नुकसान होऊ नये आणि बाजारपेठांमध्ये गर्दी न करता त्यासाठी पर्यायी व्यवस्था करता येईल, या बाबत बाजार समित्यांनी नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. अशंत: कडक निर्बंध लागू करण्यात आलेल्या काळात जिल्हा प्रशासनामार्फत आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी अनेक सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT