नांदेड, परभणी, हिंगोलीत अन्नत्याग आंदोलन
नांदेड, परभणी, हिंगोलीत अन्नत्याग आंदोलन 
मुख्य बातम्या

नांदेड, परभणी, हिंगोलीत अन्नत्याग आंदोलन

टीम अॅग्रोवन

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील शेतकरी, शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते, शिक्षक, पत्रकार, नागरिक, महिला असे विविध स्तरांतील व्यक्ती मंगळवारी (ता. १९) आयोजित अन्नत्याग आंदोलनात सहभागी झाले होते.

यवतमाळ जिल्ह्यातील चिल-गव्हाण येथील शेतकरी साहेबराव करपे यांनी १९ मार्च १९८६ रोजी सहकुटुंब आत्महत्या केली होती. ही शेतकऱ्यांची पहिली सहकुटुंब आत्महत्या मानली जाते. अजूनही शेतकरी आत्महत्याचे सत्र सुरूच आहे. आजवर आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांप्रती सहवेदना व्यक्त करण्यासाठी मंगळवारी (ता. १९) आयोजित  केलेल्या अन्नत्याग आंंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन किसानपुत्र आंदोलनतर्फे ज्येष्ठ पत्रकार तथा शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते अमर हबीब यांनी केले होते.

शेतकरी आत्महत्यांना सरकारी धोरण जबाबदार आहे. कायदे करून ते धोरण राबविले जात आहे. सरकारे बदलली, परंतु धोरणे बदलली नाहीत. जाचक कायद्यांच्या विरुद्ध तसेच शेतकरी स्वातंत्र्यासाठी करण्यात आलेल्या अन्नत्याग आंदोलनात परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, सेलू, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पूर्णा आदी तालुक्यात अन्नत्याग आंदोलन केले. तसेच नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील मालेगावसह जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार आदी गावांतील नागरिक, शेतकरी यांनी वैयक्तिक तसेच सहकुटुंब उपवास करत आंदोलनात सहभागी झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT