फळबाग योजनेत नागपूरची पिछाडी Nagpur lags behind in horticulture scheme 
मुख्य बातम्या

फळबाग योजनेत नागपूरची पिछाडी 

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत फळबाग व वृक्ष लागवड योजनेच्या उद्दिष्टपूर्तीत जिल्ह्याची पीछेहाट झाली आहे.

टीम अॅग्रोवन

नागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत फळबाग व वृक्ष लागवड योजनेच्या उद्दिष्टपूर्तीत जिल्ह्याची पीछेहाट झाली आहे. विशेष म्हणजे या योजनेत मौदा आणि रामटेक हे दोन तालुके पूर्णपणे माघारले असून, या दोन तालुक्‍यात एकही फळबाग लागवड झाली नाही. त्यामुळे कृषी विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. 

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही १०० टक्‍के केंद्र पुरस्कृत योजना आहे. जॉबकार्डधारक शेतकऱ्यांची या योजनेसाठी निवड केली जाते. ग्रामसभेची मंजुरी मिळाल्यानंतर लाभार्थी निश्चित होतात. या वर्षात राबविण्यात आलेल्या १ हजार १९९ शेतकऱ्यांच्या प्रस्तावाला तांत्रिक मंजुरी मिळूनही प्रत्यक्षात ७८९ शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेतला. रामटेक तालुक्‍यासाठी १८० तर मौदा तालुक्‍यासाठी १९० हेक्‍टर क्षेत्राचे लक्ष्यांक ठरविण्यात आले होते. मात्र या दोन्ही तालुक्‍यात ही योजना कुचकामी ठरली आहे. कृषी विभागाची नियोजनशून्यता हे कारण त्यामागे दिले जाते. 

पारशिवनी तालुक्‍यात देखील शेतकऱ्यांचा सहभाग या योजनेत मिळविता आला नाही. या तालुक्‍यात १९० हेक्‍टरपैकी १३.२० हेक्‍टरवरच फळबागा उभ्या राहिल्या. या योजनेसाठी प्रत्यक्षात २ हजार ६४० हेक्‍टर क्षेत्राचे लक्ष्यांक ठरविण्यात आले होते. मात्र ७२४.७१ हेक्‍टर क्षेत्रावरच फळबाग लागवड होऊ शकली. रामटेक, मौदा उपविभाग पिछाडले. नागपूर तालुक्‍यात ८५० पैकी १९१.६८ क्षेत्रावरच उद्दिष्टपूर्ती झाली. काटोल भागात ६७० हेक्‍टरपैकी ४३३.७३ हेक्‍टरचे उद्दिष्ट साध्य झाले आहे.

जिल्ह्यात फळपिकांमेध्य संत्र्याला सर्वाधिक पसंती राहिली. ४५६.०६ हेक्‍टर संत्रा तर १४७ हेक्‍टर मोसंबी लागवड झाली आहे. काटोल, नरखडे आणि कळमेश्‍वर हे तालुके संत्रा लागवडीत आघाडीवर आहेत. शेवग्याची अवघ्या एक हेक्‍टरवर लागवड नोंदविण्यात आली तर साग ७० हेक्‍टरवर आहे. आंबा १८.१, सीताफळ ४७.६५, कागदी लिंबू २३.८० तर चिकू ४० हेक्‍टर याप्रमाणे लागवड आहे.     

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Krushi Samruddhi Yojana: पैशाचे सोंग आणता येत नाही

Electricity Bill Recovery: महावितरणकडून वीजबिल वसुलीची मोहीम तीव्र

Water Rate Extension: पाण्याच्या दरनिश्चितीला मुदतवाढ

Panchanama Scam: ग्रामसेविकेने नुकसानभरपाईत मागितला शेतकऱ्याला वाटा

Gram Rozgar Assistant: ग्रामरोजगार सहायकांवर उपासमारीची वेळ

SCROLL FOR NEXT