संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

तेलंगणा, कर्नाटकात मूग खरेदीस प्रारंभ

कोजेन्सिस वृत्तसेवा
नवी दिल्ली ः खरिपातील नवीन मूग पिकाची तेलंगणा आणि कर्नाटकामधील बाजार समित्यांमध्ये आवक सुरू झाली आहे. मात्र सध्या मुगाचे दर हमीभावापेक्षा कमी आहेत.
 
या पार्श्वभूमीवर बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांकडून आणल्या जाणाऱ्या मुगाला चांगला दर मिळावा, या उद्देशाने राष्ट्रीय कृषी सहकारी मार्केटिंग फेडरेशनने (नाफेड) मुगाची हमीभावात खरेदी सुरू केली अाहे, असे नाफेडचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार चढ्ढा यांनी सांगितले.
 
रब्बी परिषदेच्या निमित्ताने त्यांनी ही माहिती दिली अाहे. दरम्यान, कर्नाटकातील कलबुर्गी येथे दोन दिवसांपूर्वी अावक झालेल्या मुगाला प्रतिक्विंटल ४,५००-४,६०० रुपये दर मिळाला अाहे. तर जुन्या मुगाचा दर प्रतिक्विंटल ४,९५० रुपये अाहे, अशी माहिती व्यापारी सूत्रांनी दिली.
 
मुगाची किमान आधारभूत किंमत (एमएसपी) प्रतिक्विंटल ५,५७५ रुपये निश्‍चित केली आहे. मात्र, नवीन मुगाला एमएसपीपेक्षा कमी दर मिळाला आहे.
बफर स्टॉक करण्याच्या उद्देशाने नाफेडकडून कडधान्यांचा बफर स्टॉक केला जातो. त्यानुसार नाफेडने खरीप हंगामातील कडधान्यांची खरेदी करण्यास सुरवात केली अाहे.
 
तेलंगणा, कर्नाटकामधील बाजार समित्यांमध्ये मुगाची अावक सुरू झाली अाहे. मात्र दरावर त्याचा परिणाम होत अाहे. या पार्श्वभूमीवर नाफेडने मूग खरेदी सुरू केल्याचे श्री. चढ्ढा यांनी सांगितले. 
 
मुगाची खरेदी नुकतीच सुरवात केली अाहे. पुढील दहा दिवसांत अन्य राज्यांतील बाजार समित्यांमध्ये मुगाची अावक होण्यास सुरवात होईल. राज्य सरकारकडून अालेल्या प्रस्तावानुसार त्या-त्या राज्यांत मूग खरेदी सुरू केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
 
भुईमूग खरेदीसाठी गुजरातकडून सूचना
भुईमुगाची खरेदी करण्यासाठी गुजरात सरकारकडे विनंती केली अाहे. यंदा गुजरातमध्ये भुईमुगाचे बंपर उत्पादन मिळण्याची शक्यता अाहे. या पार्श्वभूमीवर नाफेडने भुईमूग खरेदीची तयारी सुरू केली अाहे. तेलबिया उत्पादनात गुजरात राज्य अाघाडीवर अाहे. यंदा (२०१७-१८) खरीप हंगामात गुजरातमध्ये ३.२६ दशलक्ष टन भुईमूग उत्पादन मिळण्याचा अंदाज अाहे. गेल्या वर्षी २.७४ दशलक्ष टन उत्पादन झाले होते.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT