माझा शेतकरी, माझा अभिमान ! ७ ते १३ जून दरम्यान ‘शेतकरी कृतज्ञता सप्ताह’
माझा शेतकरी, माझा अभिमान ! ७ ते १३ जून दरम्यान ‘शेतकरी कृतज्ञता सप्ताह’ 
मुख्य बातम्या

माझा शेतकरी, माझा अभिमान ! ७ ते १३ जून दरम्यान ‘शेतकरी कृतज्ञता सप्ताह’

टीम अॅग्रोवन

पुणे : कोरोनाच्या कठिणकाळात जनता घरबंद असताना सर्व जोखीम पत्करून त्यांच्यापर्यंत फळे-भाजीपाला पुरविणाऱ्या बळीराजाप्रती ऋण व्यक्त करण्यासाठी ‘माझा शेतकरी-माझा अभिमान’ या हॅशटॅगखाली ७ जून ते १३ जून दरम्यान सोशलमिडियावर ‘शेतकरी कृतज्ञता सप्ताह’ साजरा केला जाणार आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाच्या लढाईत शेतकरीही ताकदीने लढतो आहे. अर्थात कोरोनाच्या लढाईत थेट त्याचा सहभाग नसला, तरी या संवेदनशील काळात देशातील एकशे पस्तीस कोटींच्या घरात फळे-भाजीपाला-अन्नधान्य-दूध पोचवून आणि कर्तव्य निभावत आहे.   कोरोनात  जीवनावश्यक सेवा बजावणाऱ्या विविध यंत्रणांमधील योद्ध्यांकरिता आपण कृतज्ञता व्यक्त करत आहोतच, मात्र फूड वॉरीयर्स (अन्न योध्दा) म्हणजेच शेतकऱ्यांबद्दल मृग नक्षत्रा (ता.७) पासून कृतज्ञता व्यक्त करण्यात येणार असल्याचे यासंदर्भात स्थापन झालेल्या समितीचे प्रमोद राजेभोसले, संतोष डुकरे, डॉ. अंकुश चोरमुले यांनी माहिती दिली.  असे असेल अभियान...  शेतकऱ्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सर्वांनी ७ जून ते १३ जून या सप्ताहात ‘माझा शेतकरी, माझा अभिमान’ चा लोगो आपल्या व्हॉटस्ॲप डीपी, स्टेट्स, फेसबुक प्रोफाईल पिक्चर म्हणून ठेवावा आणि याकरिता सर्व सोशल माध्यमांवर #MYFARMERMYPRIDE  हा हॅशटॅग वापरावा,असे आवाहन शेतकरी कृतज्ञता सप्ताह समितीमार्फत करण्यात आले आहे. लोगो MyFarmerMyPride या फेसबूक पेजवर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT