मदर डेअरीचे तीन वर्षांतील  काम निराशाजनक : नितीन गडकरी  Mother Dairy's work in three years is disappointing: Nitin Gadkari
मदर डेअरीचे तीन वर्षांतील  काम निराशाजनक : नितीन गडकरी  Mother Dairy's work in three years is disappointing: Nitin Gadkari 
मुख्य बातम्या

मदर डेअरीचे तीन वर्षांतील  काम निराशाजनक : नितीन गडकरी 

टीम अॅग्रोवन

नागपूर : गेल्या तीन वर्षांत अधोरेखित होईल, असे अपेक्षित काम मदर डेअरीने केलेले नाही. त्यासाठी नव्याने कामाला लागा. कोणत्याही परिस्थितीत दूध खरेदी कमी होता कामा नये, असे निर्देश केंद्रीय रस्ते महामार्ग वाहतूक व परिवहनमंत्री नितीन गडकरी व राज्याचे दुग्ध विकासमंत्री सुनील केदार यांनी दिले.  राष्ट्रीय दुग्ध व्यवसाय विकास महामंडळांतर्गत येणाऱ्या मदर डेअरीने विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांकडून करण्यात येणारी दूध खरेदी वाढवावी. तसेच दूध संकलन केंद्रही वाढवावे. गेल्या तीन वर्षांत अपेक्षेप्रमाणे दुग्ध व्यवसायाचा विकास होऊ शकला नाही, त्याकडे लक्ष घालावे. ५ लाख लिटर प्रति दिवसाला दूध खरेदी व्हावी, असे उद्दिष्ट बैठकीत गडकरी यांनी मदर डेअरीला दिले. तीन महिन्यांनंतर पुन्हा आढावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीला राष्ट्रीय दुग्ध विकास महामंडळाचे महामंडळाचे अध्यक्ष मीनेश शहा, मदर डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक मनीष बंडलीश, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रतापसिंग, प्रकल्प संचालक रवींद्र ठाकरे व अन्य अधिकारी उपस्थित होते. 

किरकोळ दूध खरेदी  विदर्भ व मराठवाडा भागातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अकोला, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ, लातूर, नांदेड, उस्मानाबाद आणि जालना या ११ आत्महत्या अधिक असणाऱ्या जिल्ह्यांत राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत विदर्भ मराठवाडा डेअरी डेव्हलपमेंट प्रकल्पाची तीन वर्षांपूर्वी सुरुवात करण्यात आली होती. कोल्हापूर-सोलापूरसारख्या एकट्या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्याचे जे दूध खरेदी केले जाते, तेवढे संपूर्ण विदर्भात खरेदी होते. गेल्या तीन वर्षांत मोठ्या प्रमाणात १५ ते २० लाख लिटर दूध खरेदी होणे आवश्यक होते. सन २०१६-१७ ते २०२०-२१ या दरम्यान १९९६ गावांमधील १५ हजारांवर शेतकरी मदर डेअरीशी जोडले गेले. आतापर्यंत १४७ कोटी रुपये दूध खरेदी पोटी देण्यात आले, तर मराठवाड्यात ९४७ गावांमधील ९२०३ शेतकरी या व्यवसायाशी जोडले गेले आहेत. ही आकडेवारी पाहता दूध संकलन केंद्रांचा विस्तार आणि शेतकऱ्यांची दूध खरेदी संथ गतीने असल्याचे दिसते. 

उत्पादनांचे मार्केटिंग करा  मदर डेअरीचे उत्पादन चांगले आहे, पण मार्केटिंग व्यवस्थित केले जात नाही, याकडेही मंत्री गडकरी व केदार यांनी लक्ष वेधले.  चांगले दुधाळू जनावरे तयार व्हावेत, यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि मदत दोन्हीची गरज आहे. यासाठी चाऱ्याचा प्रश्‍नही सोडविण्याचा प्रयत्न डेअरीने केला पाहिजे. या संदर्भात प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक या दोन्हींबाबत आपण मागे आहोत, यासाठी महाराष्ट्र पशुसंवर्धन विद्यापीठ परिसरात मंत्री केदार जागा व सुविधा उपलब्ध करून देतील. मात्र नियोजन करा. अधिक दूध देणारी चांगली जनावरे खरेदीसाठी शेतकरी तयार आहे. पण ते उपलब्ध होत नाही. या शिवाय डेअरीने दुधापासून बनविण्यात येणारी उत्पादनांचे मार्केटिंग प्रभावीपणे करणे आवश्यक आहे. प्रत्येक जिल्ह्यांतून ५ लाख लिटर दुधाचे संकलन आणि खरेदी होईल तेव्हाच आपली यशस्वी गाथा लोकांसमोर येईल, असेही गडकरी म्हणाले. आगामी तीन महिन्यांत हे चित्र बदलून दाखवू, अशी ग्वाही महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. सध्या नागपूर येथून मदर डेअरीद्वारे संकलित ९० हजार लिटर दूध रोज दिल्लीला जात असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील काळात राज्य शासनासोबत प्रशिक्षणाचे कार्य आणखी जोमाने केले जाईल. तसेच काही उत्पादनांसाठी विदर्भामध्ये प्रक्रिया उद्योग सुरू करण्याबाबत विचार केला जाईल, असेही महामंडळाकडून या वेळी स्पष्ट केले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT