राज्याच्या बहुतांश भागात  सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज  In most parts of the state Rainfall forecast above average
राज्याच्या बहुतांश भागात  सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज  In most parts of the state Rainfall forecast above average 
मुख्य बातम्या

राज्याच्या बहुतांश भागात  सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज 

टीम अॅग्रोवन

पुणे : ‘गुलाब’ चक्रीवादळामुळे गेल्या आठवड्यात राज्याचा अनेक भागात पावसाने हाहाकार झाला. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. राज्यात विजा, मेघगर्जनेसह पाऊस पडत असून, १ ते ७ सप्टेंबर या आठवडाभराच्या कालावधीत राज्याच्या बहुतांशी भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा, तर उत्तर कोकणात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

सप्टेंबर महिन्यात राज्याच्या बहुतांशी भागात दमदार पावसाने हजेरी लावली. पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसाने धरणे ओसंडून वाहिल्याने नद्यांना पूर आले. बंगालच्या उपसागरात तयार झालेले गुलाब चक्रीवादळ महाराष्ट्रातून अरबी समुद्रात गेले. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात तुफान पाऊस पडला. पूर्व विदर्भ, दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पावसाने प्रमाण कमी होते. 

२३ ते २९ सप्टेंबर या कालावधी विदर्भातील वाशीम जिल्ह्यात आठवड्याच्या सरासरीच्या तुलनेत ५२५ टक्के अधिक पाऊस पडला. तर मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यात ५०३ टक्के अधिक पावसाची नोंद झाली. या शिवाय मराठवाड्यातील बुलडाणा, हिंगोली, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, नांदेड, बीड, लातूर, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, नंदूरबार जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत ३०० टक्क्यांपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि सांगली जिल्ह्यामध्ये आठवडाभरात सरासरीच्या तुलनेत सर्वात कमी पाऊस पडला. सातारा जिल्ह्यात उणे ७५ टक्के, तर सांगली जिल्ह्यात उणे ७४ टक्के पाऊस झाला. पुणे जिल्ह्यात उणे १९ तर कोल्हापूर जिल्ह्यात उणे ९ टक्के पावसाची नोंद होत सरासरी गाठली. पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्यात उणे २४ टक्के पाऊस झाला असून, गडचिरोलीत उणे १४ टक्के पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागाच्या नोंदीवरून स्पष्ट झाले आहे.  कोकण वगळता सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज  हवामान विभागाच्या अंदाजानुसार पहिल्या आठवड्यात (१ ते ७ ऑक्टोबर) राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. उत्तर कोकणात सरासरीच्या तुलनेत कमी पावसाचा, तर उर्वरीत कोकणात सरासरी इतक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  दुसऱ्या आठवड्यात चांगला पाऊस  तर दुसऱ्या आठवड्यात (८ ते १४ ऑक्टोबर) मॉन्सूनच्या परतीच्या काळात राज्यात चांगल्या पावसाचे संकेत आहेत. महाराष्ट्रात चारही विभागांमध्ये सर्वदूर सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT