Most of the cotton sales were completed in Aurangabad, Jalna and Beed districts 
मुख्य बातम्या

औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत कापसाच्या बहुतांश वेचण्या उरकल्या

बीड : मराठवाड्यातील तीनही जिल्ह्यांत सरासरीच्या ८५ टक्‍के कपाशीची लागवड झाली. या पिकाच्या बहुतांश वेचण्या उरकल्या आहेत. तर, तुरीवर काही ठिकाणी शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादूर्भाव दिसून आला आहे.

टीम अॅग्रोवन

बीड : मराठवाड्यातील तीनही जिल्ह्यांत सरासरीच्या ८५ टक्‍के कपाशीची लागवड झाली. या पिकाच्या बहुतांश वेचण्या उरकल्या आहेत. तर, तुरीवर काही ठिकाणी शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादूर्भाव दिसून आला आहे.

औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत कपाशीचे सरासरी क्षेत्र १० लाख ४१ हजार ९७१ हेक्‍टर होते. प्रत्यक्षात ८ लाख ८८ हजार ९३५ हेक्‍टरवर कपाशीची लागवड झाली. त्यापैकी औरंगाबाद जिल्ह्यातील ३ लाख ६१ हजार ८२५ हेक्‍टरवरील कपाशीच्या पिकामध्ये अनेक ठिकाणी गुलाबी बोंड अळीचा प्रादूर्भाव आढळून आला आहे. बहुतांश ठिकाणी कपाशीच्या २ वेचण्या पूर्ण झाल्या आहेत. जालना जिल्ह्यात कपाशीच्या सरासरी २ लाख ९० हजार १५१ हेक्‍टर क्षेत्राच्या तुलनेत २ लाख ६२ हजार ९४१ हेक्‍टरवर कपाशीची लागवड झाली. अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात नुकसान कपाशीचे नुकसान झाले. वाचलेल्या पिकात सद्यःस्थितीत वेचणीचे काम सुरू आहे. 

बीड जिल्ह्यात कपाशीच्या सरासरी ३ लाख ५७ हजार ५५२ हेक्‍टर क्षेत्राच्या तुलनेत २ लाख ६४ हजार १६९ हेक्‍टरवर कपाशीची लागवड झाली. जिल्ह्यातील हलक्‍या जमिनीवरील कपाशीची वेचणी संपली आहे. मध्यम ते भारी जमिनीवरील कपाशीच्या वेचणीचे काम सुरू आहे. 

औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यात तुरीचे सरासरी क्षेत्र १ लाख २७ हजार हेक्‍टर आहे. त्या तुलनेत प्रत्यक्षात १ लाख ८४ हजार २३१ हेक्‍टरवर तुरीची पेरणी झाली. सरासरी क्षेत्राच्या पुढे जाऊन शेतकऱ्यांनी तुरीला पसंती दिली. तरीही औरंगाबाद जिल्ह्यात उशिरा पेरणी झालेल्या ठिकाणी पावसाच्या खंडामुळे पीक विरळ झाले. अति पावसामुळे तुरीवर मर रोगाचा प्रादूर्भाव झाला. सद्यःस्थितीत संकटातून वाचलेले तुरीचे पीक बहुतांश ठिकाणी दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे.

जालना जिल्ह्यात वेळेत पेरणी झालेले तुरीचे पीक दाणे परिपक्‍व होण्याच्या, तर उशिरा पेरणी झालेले तुरीचे पीक फुले व शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे. बीड जिल्ह्यातील तुरीच्या पिकावर ढगाळ वातावरणामुळे काही ठिकाणी शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचा प्रादूर्भाव आढळून आला. तर बहुतांश भागातील पीक शेंगा पक्‍वतेच्या अवस्थेत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Payment: उसाचा १०० रुपये दुसरा हप्ता तातडीने जमा करा अन्यथा आंदोलन, 'स्वाभिमानी'चा कारखान्यांना इशारा

Parbhani Dam Water Update: परभणी जिल्ह्यातील लघु प्रकल्पांत ११, मध्यम प्रकल्पांत ९ टक्के पाणीसाठा

Turmeric Farmers Support: हळदीला विमा संरक्षणाने शेतकऱ्यांना दिलासा

Fertilizer Dealers Complaint: खत विक्रीत लिंकिंगचा आरोप

Women Farmers: ‘वसंधुरा’च्या महिलांकडून सायकल कोळप्याने कोळपणी

SCROLL FOR NEXT