पुणे जिल्ह्यात बहुतांश लढती स्पष्ट, अनेकांचे उमेदवारी अर्ज दाखल
पुणे जिल्ह्यात बहुतांश लढती स्पष्ट, अनेकांचे उमेदवारी अर्ज दाखल 
मुख्य बातम्या

पुणे जिल्ह्यात बहुतांश लढती स्पष्ट, अनेकांचे उमेदवारी अर्ज दाखल

टीम अॅग्रोवन

पुणे : विधासभा निवडणुकीतील महायुती आणि आघाडीच्या जागा वाटपानंतर उमेदवारांच्या याद्या जाहीर होऊ लागल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश लढती स्पष्ट झाल्‍या आहेत. राष्ट्रवादीच्या जाहीर झालेल्या यादीमधून जुन्नर, आंबेगाव खेड, शिरूरच्या लढती स्पष्ट झाल्या आहेत. आंबेगावमधील शिवसेनेच्या उमेदवाराची उत्सुकता संपली असून, दुपारी राजाराम बाणखेले यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले. 

इंदापूर, दौंड, बारामती, भोर, मावळ, पुरंदरच्या लढती या अगोदरच स्पष्ट झाल्या आहेत. गुरुवारी (ता. ३) जिल्‍ह्यात जुन्नरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अतुल बेनके, आंबेगावमधून राष्ट्रवादीकडून दिलीप वळसे पाटील, इंदापूरमधून भाजपचे हर्षवर्धन पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या दोन्ही उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन आणि जाहीर सभा घेत उमेदवारी अर्ज दाखल केले. 

पुणे शहरात सेनेची मनसेला छुपी साथ? 

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मस्थान असलेल्या पुणे शहरात शिवनेनेला एकही जागा न मिळाल्याने शिवसैनिक अस्वस्थ आहेत. ते भाजपवरील राग मनसेला छुपी साथ देऊन व्यक्त करण्याची शक्यता आहे. मनसेचे उमेदवार हे पूर्वीश्रमीचे शिवसैनिकच असल्याने महाराष्ट्र सैनिक आणि शिवसैनिक यांच्यातील ऋणानुबंध कायम आहेत. यामुळे मनसेला शिवसैनिकांची छुपी साथ मिळाल्यास एक दोन ठिकाणी यश मिळू शकते, असे राजकीय निरीक्षकांनी सांगितले.

अशा असतील प्रमुख लढती...

बारामती अजित पवार (राष्ट्रवादी) गोपीचंद पडळकर (भाजप) 
इंदापूर दत्तात्रय भरणे (राष्ट्रवादी) हर्षवर्धन पाटील (भाजप) 
दौंड राहुल कुल (रासप) रमेश थोरात (राष्ट्रवादी)
पुरंदर  विजय शिवतारे (शिवसेना) संजय जगताप (काँग्रेस)
भोर   संग्राम थोपटे (काँग्रेस)  कुलदीप कोंडे (शिवसेना) 
जुन्नर   शरद सोनवणे (शिवसेना) अतुल बेनके (राष्ट्रवादी) 
खेड सुरेश गोरे (शिवसेना) दिलीप मोहिते (राष्ट्रवादी)
आंबेगाव दिलीप वळसे पाटील (राष्ट्रवादी) राजाराम बाणखेले (शिवसेना) 
शिरूर  बाबुराव पाचर्णे (भाजप) अशोक पवार (राष्ट्रवादी) 
मावळ   संजय (बाळा) भेगडे(भाजप) सुनील शेळके (राष्ट्रवादी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT