दोन आठवड्यांनंतर मॉन्सूनची प्रगती..
दोन आठवड्यांनंतर मॉन्सूनची प्रगती.. 
मुख्य बातम्या

दोन आठवड्यांनंतर मॉन्सूनची प्रगती..

टीम अॅग्रोवन

पुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) महाराष्ट्रात जवळपास दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर शनिवारी (ता. २३) पुढे चाल केली आहे. मॉन्सूनने संपूर्ण कोकण किनारपट्टी व्यापून गुजरातच्या वलसाड, मध्य महाराष्ट्रातील मालेगाव तर विदर्भातील अमरावतीपर्यंत मजल मारली आहे. मंगळवारपर्यंत (ता. १६) महाराष्ट्रासह देशातील आणखी काही भागात मॉन्सूनची वाटचाल शक्य असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. 

विषुववृत्ताकडून येणाऱ्या वाऱ्यांचा वेग कमी होणे, माॅन्सूनच्या वाटचालीसाठी आवश्‍यक ‘मेडिअन जुलिअन ऑस्सिलेशन’ची (एमजेओ) प्रतिकूल स्थिती, मध्य आणि पूर्व प्रशांत महासागर, पश्‍चिम गोलार्ध, आफ्रिकेलगत पूर्वेकडे जाणारे प्रवाह, वायव्य प्रशांत महासागरात हवेचे कमी झालेले दाब यामुळे मॉन्सूनवर परिणाम झाला. वाऱ्यांचे प्रवाह मंदावल्याने मॉन्सूनची महाराष्ट्रातील वाटचाल ११ जूनपासून झाली नव्हती. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात ९ जूनपासून मॉन्सूनची स्थिती जैसे थे होती. मात्र ‘एमजेओची’ स्थिती पोषक झाल्यानंतर शनिवारी तब्बल १४ दिवसांनंतर या भागात मॉन्सूनेने दक्षिण गुजरातच्या वलसाड, मध्य महाराष्ट्रातील मालेगाव, विदर्भातील अमरावतीपर्यंत वाटचाल केल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले.   मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक स्थिती निर्माण होत असून, मंगळवारपर्यंत (ता. २६) उत्तर अरबी समुद्र, उर्वरित महाराष्ट्र, आसाम, तसेच गुजरात, छत्तीसगड, ओडिशा, पश्‍चिम बंगाल, झारखंड, मध्य प्रदेशाच्या आणखी काही भागात माॅन्सूनची प्रगती होण्याची शक्यता आहे. तर वायव्य भारतातील राज्यांमध्ये बुधवारपासून विजांसह पूर्वमोसमी पावसाला सुरवात होईल, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Golden Jubilee : मातीच्या सन्मानाने ‘स्वराज ट्रॅक्टर्स’चा सुवर्ण महोत्सव साजरा

Crop Nutrient Management : पीक उत्पादन वाढीसाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापन

Fishery Employment : मत्स्य व्यवसायातील रोजगाराच्या विविध संधी

Raju Shetti Vs Eknath Shinde : 'शेतकरी तुम्हाला दहशतवादी वाटला का'? राजू शेट्टींच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटीसा

Bird flu : केरळमधील बर्ड फ्लूने कर्नाटक अलर्टमोडवर; सीमावर्ती भागात तपासणी वाढवली

SCROLL FOR NEXT