मॉन्सून मंगळवारपर्यंत कोकणातील काही भागात शक्य...
मॉन्सून मंगळवारपर्यंत कोकणातील काही भागात शक्य... 
मुख्य बातम्या

मॉन्सून मंगळवारपर्यंत कोकणातील काही भागात शक्य...

टीम अॅग्रोवन

पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेले कमी दाबाचे क्षेत्र नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) वाटचालीस पूरक ठरण्याचे संकेत आहेत. मंगळवारपर्यंत (ता.९) मॉन्सून कोकणातील काही भागात दाखल होण्याची शक्यता आहे. रविवारी (ता.७) मॉन्सूनने तामिळनाडूचा बहुतांशी भाग, अंतर्गत कर्नाटकचा आणखी काही भाग आणि आंध्र प्रदेशाच्या रायलसीमा भागात प्रगती केल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. कोकणात दाखल होताच महाराष्ट्राच्या इतर भागातही मॉन्सून वेगाने प्रगती करण्याची शक्यता आहे.  

गुरूवारी (ता.४) पश्चिम किनारपट्टीवर वाटचाल करत, संपूर्ण केरळ व्यापला आहे. कर्नाटक राज्याची संपूर्ण किनारपट्टी व्यापून मॉन्सून वारे गोव्याच्या उंबरठ्यावर दाखल झाले आहे. त्याआधी अरबी समुद्रात असलेल्या ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे मॉन्सून वाऱ्यांचे प्रवाह प्रभावित होऊन १ जून रोजी केरळमध्ये दाखल झाला आहे. देशाच्या मुख्य भूमीवर आगमन होताच, गुरुवारी (ता.४) केरळचा कोमोरीनचा सर्व भाग, श्रीलंका व दक्षिण बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग, कर्नाटक किनारपट्टीवरील कारवार, हसनपर्यंत आणि मध्य अरबी समुद्राच्या काही भागात मॉन्सून दाखल झाले. शनिवारी दक्षिण अंतर्गत कर्नाटक, तामिळनाडूच्या सालेमपर्यंत मजल मारली असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. 

‘निसर्ग’मुळे मॉन्सून वाऱ्यांवर प्रभाव पडल्याने पश्चिम किनारपट्टीवर मॉन्सूनने प्रगती केली. कर्नाटक तामिळनाडूच्या अंतर्गत भागात मात्र मॉन्सून दाखल झालेला नव्हता. वादळ जमिनीवर येऊन निवळल्यानंतर वाऱ्याचे प्रवाह सुरळीत होऊ लागले आहेत. यातच बंगालच्या उपसागरात मंगळवारपर्यंत (ता.९) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. हे कमी दाब क्षेत्र मॉन्सूनसाठी पोषक ठरून वेगाने वाटचाल होण्याची शक्यता आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT