सॅन फ्रॅन्सिसको : पत्नी मॅरी हार्डेमन यांच्यासह कॅन्सरपीडित एडविन हार्डेमन.
सॅन फ्रॅन्सिसको : पत्नी मॅरी हार्डेमन यांच्यासह कॅन्सरपीडित एडविन हार्डेमन. 
मुख्य बातम्या

मोन्सॅन्टो कंपनीला पुन्हा साडेपाचशे कोटींचा दंड; कॅन्सरग्रस्ताने जिंकली न्यायालयीन लढाई

वृत्तसेवा

सॅन फ्रॅन्सिस्को : अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील एडविन हार्डेमन यांना कर्करोग होण्यामागे ग्लायफोसेट हे तणनाशक कारणीभूत असल्याचा दावा सॅन फ्रॅन्सिस्को जिल्हा न्यायालयाने मान्य केला आहे. त्यासाठी हे तणनाशक तयार करणाऱ्या मोन्सॅन्टो या कंपनीला ८० दशलक्ष अमेरिकी डॉलरपेक्षा (सुमारे ५५२ कोटी रुपये) अधिक रकमेचा दंडही न्यायालयाने ठोठावला आहे. यापूर्वीही अशा प्रकरणात कंपनीला दंडात्मक शिक्षेला सामोरे जावे लागले आहे.  न्यायालयाच्या सहा जणांच्या ज्युरीने बुधवारी (ता. २७) हा निकाल देताना एडविन यांना झालेल्या कर्करोगासाठी ग्लायफोसेट हे तणनाशक कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. त्यासाठी न्यायालयाने मोन्सॅन्टो कंपनीला जबाबदार धरले आहे. या तणनाशकाच्या वापरामुळे कर्करोग होऊ शकतो असा इशारा मोन्सॅन्टो कंपनीने आपल्या उत्पादनाच्या लेबलवर कुठेही प्रसिद्ध केलेला नसल्याचे न्यायाधीशांनी निकाल देताना म्हटले आहे.  एडविन हार्डेमन हे सत्तर वर्षांचे गृहस्थ आपल्या मालकीच्या जागेत तण नियंत्रण करण्यासाठी मोन्सॅन्टो कंपनीच्या राऊंड अप या तणनाशकाचा वापर सुमारे २६ वर्षांपासून करीत होते. ग्लायफोसेट हा या तणनाशकातील सक्रिय घटक आहे. त्याच्या वापराने आपल्याला कर्करोग झाल्याचे २०१५ मध्ये एडविन यांच्या लक्षात आले. विशेष म्हणजे त्या आधीच एक वर्ष जागतिक आरोग्य संघटनेच्या आंतरराष्ट्रीय कर्करोग संशोधन एजन्सीने ग्लायफोसेटच्या वापरामुळे कर्करोग होऊ शकतो, असे जाहीर केले होते. न्यायालयाच आपली बाजू मांडताना त्याचा आधार एडविन यांनी घेतला.   एडविन यांचे जे काही नुकसान झाले आहे त्यासाठी कंपनीला तब्बल ७५ दशलक्ष अमेरिकी डॉलर एवढ्या रकमेचा दंडही ठोठावण्यात आला आहे. एडविन यांना या विकारापायी जो त्रास सहन करावा लागला त्यापोटी पाच दशलक्ष डॉलर, तर औषधोपचारांच्या खर्चासाठी एकूण दोन लाख डॉलर एवढ्या दंडाचीही शिक्षा कंपनीला सुनावण्यात आली आहे. एडविन यांच्या वकिलांनी सर्व प्रकारचे संशोधनात्मक पुरावे न्यायालयात सादर केले. ग्लाफोसेटच्या संपर्कात आल्याने मानवी पेशी बदल घडू शकतो व कर्करोग होऊ शकतो यासंदर्भातील शास्त्रीय पुराव्यांचा यात समावेश होता. 

कंपनी मागणार दाद एडविन यांचे वकील जेनिफर मुरी याविषयी प्रतिक्रिया देताना म्हणाले, की ग्लायफोसेटच्या वापरामुळे मानवी आरोग्यावर जे प्रतिकूल परिणाम होतात त्याबाबत वैज्ञानिक अभ्यास झाला आहे. मोन्सॅन्टो कंपनीने सातत्याने त्याकडे दुर्लक्षच करायचे काम केले आहे. मोन्सॅन्टो कंपनीचे हक्क आता बायर या बहुराष्ट्रीय कंपनीकडे आहेत. न्यायालयाने बुधवारी दिलेल्या निकालावर आपण समाधानी नसून, त्या विरोधात पुढील न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे. ग्लायफोसेट हे जगभरात वापरले जाणारे तणनाशक आहे. मात्र सध्या कर्करोगाच्या कारणावरून ते जगभरात वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.  मोन्सॅन्टो कंपनीच्या संंबधित उत्पादनाविरुद्ध एडविन यांच्याप्रमाणेच एकट्या अमेरिकेत ११,२०० हून अधिक खटले न्यायालयात दाखल करण्यात आले आहेत. अॉगस्ट २०१८ मध्ये कॅलिफोर्निया येथील मैदान संरक्षक डिवायन जॉन्सन यांच्या प्रकरणात मोन्सॅन्टो कंपनीला ७८.५ दशलक्ष डॉलर्सचा दंड बसला आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT