MLA locks up marketing office
MLA locks up marketing office 
मुख्य बातम्या

पणन कार्यालयाला ठोकले आमदारांनी कुलूप

टीम अॅग्रोवन

भंडारा ः आधारभूत धान खरेदी केंद्रावरील असुविधांचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांची दखल पणनकडून घेतली जात नसल्याने संतप्त झालेले आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी शनिवारी (ता. ४) चक्क कार्यालयालाच कुलूप ठोकले.  

जिल्ह्यात ७३ आधारभूत खरेदी केंद्रावर धान खरेदी सुरू आहे. गोदामाच्या अभावाने खरेदी मंदावली आहे. परिणामी, शेतकऱ्यांना आपला धान उघड्यावर ठेवावा लागत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक आधारभूत केंद्रावर शेकडो क्‍विंटल धान उघड्यावर आहे. गत आठ दिवसापांसून ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी पावसाने देखील हजेरी लावली. काही केंद्रावर असलेले उघड्यावरील धानही भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. 

विशेष म्हणजे धान खरेदी केंद्रांची संख्या वाढवून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्यानंतरही अधिकाऱ्यांकडून कोणत्याच उपाययोजना करण्यात आल्या नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते. 

त्यानंतर या तक्रारींमागील सत्यता जाणून घेण्याकरिता आमदार भोंडेकर आपल्या समर्थकांसह जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात धडकले. परंतु, कुणीही समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही. त्यामुळे थेट कार्यालयालाच कुलूप ठोकले. 

शेतकऱ्यांची अडचण शासनाकडून हमीभावाला जोडून बोनस आणि अतिरिक्‍त २०० रुपये देण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रतिक्‍विंटल २५०० रुपयांचा दर मिळत आहे. परंतु, जिल्ह्यात शेतकऱ्यांना धान विक्री करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हा प्रकार ज्यांच्याकडून घडत आहे त्यांना निलंबित करावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आल्याचे आमदार भोंडेकर यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT