...तर, आमचेही कार्यकर्ते मैदानात : महादेव जानकर
...तर, आमचेही कार्यकर्ते मैदानात : महादेव जानकर 
मुख्य बातम्या

आंदोलन होणार असेल तर, आमचेही कार्यकर्ते मैदानात : महादेव जानकर

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : दुधाला दरवाढ दिली असून दूध संघांनी त्याप्रमाणे उत्पादक शेतकऱ्यांना देण्याचे मान्य केले. त्यानंतरही आंदोलन होणार असेल, तर आमचेही कार्यकर्ते मैदानात उतरतील, असा सूचक इशारा देतानाच दूध उत्पादकांच्या वाहनांना पोलिस संरक्षण दिले जाणार आहे, असे पशुसंवर्धन-दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी रविवारी (ता.१५) येथे सांगितले. मुंबईमध्ये गेल्या तीन दिवसात 10 लाख लिटर दुधाचा साठा करण्यात आलेला असल्याने मुंबईला दुधाची कमतरता भासणार नाही, असाही निर्वाळा त्यांनी दिला. आंदोलकांनी कायदा-सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती श्री. जानकर यांनी दिली.

खासगी कार्यक्रमासाठी श्री. जानकर हे नाशिकमध्ये आले असताना सरकारी विश्रामगृहात त्यांनी `सकाळ'शी संवाद साधला. ते म्हणाले, की दुधाला 5 रुपयांची दरवाढ देण्यात आली असून यात 3 रुपयांची दरवाढ येत्या 20 जुलैपासून दिली जाईल. दुधावरील जी.एस.टी. रद्द केल्यानंतर 2 रुपयांची आणखी भर पडेल. त्यानुसार राज्यातील दूध संघांना नोटिसीद्वारे कळविले गेले असून त्यांनी दूध उत्पादकांना दरवाढ द्यायची आहे. त्यानंतरही जे दूधसंघ दरवाढ देणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

शेतकऱ्यांच्या मुलांना नासाडी शोभत नाही  खासदार राजू शेट्टी यांच्याकडून आंदोलनाचा पुनर्उच्चार केल्याबद्दल विचारले असता श्री. जानकर म्हणाले, की आंदोलनकर्त्यांनी आंदोलन करावे. पण त्यापूर्वी आपणही शेतकऱ्यांची मुले आहोत, दूध अथवा भाजीपाल्याची नासाडी करणे शोभत नाही याचा विचार करावा. शिवाय आंदोलन करताना ते हिंसक होणार नाही, याचीही काळजी घेणे गरजेचे आहे. जर कायदा हाती घेण्याचा प्रयत्न केला, तर कायदेशीर कारवाई केली जाईल. त्याचप्रमाणे दूध उत्पादकांनी आंदोलनाला न घाबरता दूध पुरवठा करावा. 

`गोकुळ'वर कारवाई गोकुळ दूध संघाने उद्या (ता.16) पासूनच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. त्यासंदर्भात श्री. जानकर यांनी माहिती घेतो असे सांगितले. शिवाय "गोकुळ'ने आंदोलनास पाठिंबा दिलाच असेल, तर तात्काळ कारवाई केली जाईल आणि प्रशासक नेमला जाईल, असेही श्री. जानकर म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT