अकोला तालुक्यात मंत्र्यांचा ‘एक दिवस शेतकऱ्यांसोबत’
अकोला तालुक्यात मंत्र्यांचा ‘एक दिवस शेतकऱ्यांसोबत’ 
मुख्य बातम्या

अकोला तालुक्यात मंत्र्यांचा ‘एक दिवस शेतकऱ्यांसोबत’

टीम अॅग्रोवन

अकोला : ‘एक दिवस शेतकऱ्यांसोबत’ या उपक्रमांतर्गत पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शनिवारी (३० जून) अकोला तालुक्यातील डोंगरगाव, मासा-सिसा (उदे) येथील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतली.   यावेळी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, तहसीलदार विजय लोखंडे, कृषी अधिकारी व अन्य अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून जिल्हाभरात एक दिवस शेतकऱ्यांसोबत हा उपक्रम राबविण्यात आला. पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सकाळी डोंगरगावला भेट दिली. येथील मधुकर महादेव देवकर यांच्या शेतात जाऊन त्यांनी शेताची पाहणी केली. पेरणीसाठी कोणते बियाणे वापरले, कुठून खरेदी केली, याबाबत चौकशी केल्यानंतर त्यांच्यासह परिसरातील उपस्थित शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर शेतकऱ्यांसोबत जेवण केले. याच परिसरातील श्रीकृष्ण नामदेव देवर यांच्या दहा गुंठ्यात लागवड केलेल्या पालकाची त्यांनी पाहणी केली.   याच परिसरातील शेतातील वाकडे झालेले बिजेचे खांब दोन दिवसांत सरळ करण्याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना सूचना केली. डोंगरगावातील प्रगतिशील शेतकरी शिरीष देशमुख यांच्या शेडनेटला त्यांनी भेट दिली. स्वातंत्र्यसैनिक रमाबाई शंकरराव देशमुख यांची त्यांनी भेट घेऊन चौकशी केली. मासा-सिसा (उदे) येथील तरुण शेतकरी प्रफुल्ल भास्कर फाले याने तयार केलेल्या भुईमूग फोडणी यंत्राची पाहणी करून त्याचे कौतुक केले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT