आषाढी सोहळ्यासाठी लाखो वारकऱ्यांची पंढरीत मांदियाळी
आषाढी सोहळ्यासाठी लाखो वारकऱ्यांची पंढरीत मांदियाळी 
मुख्य बातम्या

आषाढी सोहळ्यासाठी लाखो वारकऱ्यांची पंढरीत मांदियाळी

टीम अॅग्रोवन

पंढरपूर, जि. सोलापूर : पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान । आणिक दर्शन विठोबाचे ।। अशी भावना व्यक्त करत वारकऱ्यांनी सोमवारी (ता. २३) आषाढीच्या सोहळ्यात मोठ्या भक्तिभावाने सहभाग घेत विठुनामाचा गजर केला. वारकरी परंपरेत आषाढी एकादशीला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे पहाटेपासूनच टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषाने अवघी पंढरी दुमदुमून गेली.

आषाढीचा मुख्य सोहळा असल्याने दर्शनरांगेसह चंद्रभागा नदी आणि प्रदक्षिणा मार्गावर वारकऱ्यांची एकच गर्दी उसळली. नदी तीरावर तर पहाटेपासूनच स्नानासाठी गर्दी झाली होती. सकाळपर्यंत पंढरीत सुमारे दहा लाखांपर्यंत वारकरी दाखल झाले होते. कोणी मुखदर्शन, कोणी नदीवरील स्नान करून तर कोणी प्रदक्षिणा मार्गावरील प्रदक्षिणा पूर्ण करून आपापल्या सोईनुसार आपली वारी पोचवत असल्याचे चित्र होते.

शहरातील विविध मंदिरे, मठ, धर्मशाळा यामधून सुरू असलेल्या भजन, कीर्तन, प्रवचनाने पंढरी भक्तिरसाच्या एका वेगळ्याच उत्साहाने भारून गेली. आजही दर्शनरांगेत जवळपास दीड लाखाहून अधिक वारकरी होते. नगर प्रदक्षिणेसाठी वारकरी आणि दिंड्या निघत होत्या. त्यामुळे शहरातील विविध संतांच्या मठ, धर्मशाळाबरोबर रस्त्यावरही भक्तिप्रवाह ओसंडून वाहत होता. दुपारी रथोत्सवाची मिरवणूक काढण्यात आली. त्या वेळीही एक वेगळेच चैतन्य निर्माण झाले. वारी पोचवून भक्तीचा हा प्रवाह हळूहळू परतीच्या प्रवासाला लागला होता.

"जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता'' अशी भावना पंढरीतून पाय काढताना वारकऱ्यांच्या मनात आणि डोळ्यांत दिसत होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT