तोट्यातील भागीदार
तोट्यातील भागीदार 
मुख्य बातम्या

संघ तोट्यात असतानाच दूध उत्पादकांची आठवण

Raj Chougule

कोल्हापूर : राज्याच्या विविध भागांत जसे साखर कारखान्यांवर राजकारण चालते. अगदी तसाच प्रकार दूध संघांच्या बाबतीतही आहे. दूध संघाच्या माध्यमातून लाखो दूध उत्पादक या संघाच्या माध्यमातून जोडले जात आहेत. पण अलीकडचा एक दोन वर्षांच्या कालावधी लक्षात घेतल्यास अनेक दूध संघांना तोट्यात असतानाच दूध उत्पादकांची आठवण येते. इतर वेळी मात्र त्याच्या समस्येकडे लक्ष दिले जात नाही ही वस्तुस्थिती आहे.

...तेव्हा पर्याय का नाही दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी हे बहुतांशी करून अल्पभूधारक आहेत. अनेकांचा उदरनिर्वाह याच व्यवसायावर चालतो. यामुळे आठवड्याच्या नियोजनातून काही रक्कम जरी कमी आली तरी त्याचा थेट परिणाम घराचे आर्थिक नियोजन कोलमडल्यावर होत असतो. अनेक संघ पशुखाद्याची शिफारस करतात दर मात्र संघाच्या नफ्यानुसार ठेवतात. बहुतांशी नामवंत संघांचे पशुखाद्य कारखाने आहेत. पशुखाद्य करताना लागणाऱ्या कच्च्या मालाचा दर वाढू लागताच त्याचा तातडीचा परिणाम पशुखाद्याच्या किंमती वाढण्यावर होतो. मात्र ही वाढ हळूच उत्पादकांवर लादली जाते. पशुखाद्याच्या किंमती वाढल्या म्हणून कोणताही संघ आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे दिसत नाही. अथवा किंमती वाढल्या तरी उत्पादकांना तोटा होऊ नये म्हणून खास योजना राबविल्याचेही कुठे दिसत नाही. पशुखाद्याचा खर्च दुधातून वळता होत असल्याने शेतकऱ्याला वाढलेला खर्च कळत नाही तो नुकसानीत जातो, अशी परिस्थिती आहे.

गोठ्यांच्या संख्येत घट चिंतेची गेल्या चार ते पाच वर्षांचा विशेष करून पश्‍चिम महाराष्ट्राचा आढावा घेतल्यास अनेक गोठा व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात जनावरांचे व्यवस्थापन करणे कमी केले आहे. यामुळे मातब्बर दूध संघांच्या आगारातच अनेक व्यावसायिकांनी एक तर गोठे बंद केले. अथवा जनावरांची कमी केली. जे व्यावसायिक पूणपणे बाहेरील मनुष्यबळावर अवलंबून आहेत त्यांना तर मनुष्यबळ नसल्यानेच गोठे बंद करावे लागले. तर उर्वरित गोठे दर नसल्याने बंद झाले आहेत. ज्या गोठ्यांच्या मालकांनी स्वत:ची अशी स्वतंत्र विक्री व्यवस्था करून फायदा मिळविला. अथवा जनावरांची खरेदी विक्री हा हेतू ठेवून गोठा चालविला आहे. फक्त दूध संघाला दूध पुरवठा करून हा व्यवसाय फायद्यात असलले गोठे क्वचित असल्याचे चित्र या भागात आहे. अशा परिस्थितीमुळे लाखो रुपये गुंतवून पूर्णपणे व्यावसायिक स्वरुपात गोठे निर्माण होण्याचे काम लक्षणीयरीत्या कमी झाले आहे. याचे मुख्य कारण दुधाला दर नसणे, उत्पादनखर्चापेक्षा दुधाला मिळणारी किंमत आणि वर्षानुवर्षे तोटा झाल्याने नाइलाजास्तव हा व्यवसायच बंद करण्यात होत आहे. उत्पादकाला केंद्रसस्थानी ठेवून धोरण निश्‍चिती न झाल्यास भविष्यात शेतकऱ्यांचा हा जोडधंदा आणखी तोट्यात जाण्याची भीती उत्पादकांतून व्यक्त होत आहे.

उत्पादकांच्या खांद्यावर बंदूक नको आंतरराष्ट्रीय बाजारात गोंधळ निर्माण झाला. दुधाचे उत्पादन वाढले, पावडरीचे दर कोसळले की कोणत्याही क्षणी दूध खरेदीच्या दरात दणकन कपात होते. जो तो संघ ज्याच्या त्याच्या परिस्थितीप्रमाणे खरेदीच्या दूधदरात कपात करतो. दूध संघ कसा तोट्यात जातो याबाबतच्या चर्चा सुरू होतात. उत्पादकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सरकारशी लढा दिला जातो. अशावेळीच दूध उत्पादकांच्या तोट्याला महत्त्व दिले जात असल्याचा आरोप सिद्धनेली येथील पांडूरंग काकडे यांनी केला. दूध संघ कसा तोट्यात आहे. हेच आम्हाला सांगितले जाते. पण आम्ही वर्षानुवर्षे तोट्यात आहोत याचे काय, असा सवाल काकडे यांचा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande : अविरत कर्मयोगी

Wheat Market : विदर्भात गव्हाच्या दरात चढ-उतार

Cotton Productivity : परभणी जिल्ह्यात कापूस रुईचा उतारा हेक्टरी ३ क्विंटल ९८ किलो

Water Scarcity : करकंब परिसरात द्राक्षबागांना टँकरने पाणी

Dam Water Stock : देशातील मोठी ७ धरणे कोरडी

SCROLL FOR NEXT