weather
weather  
मुख्य बातम्या

कमाल तापमानात घट; विदर्भात हलक्या पावसाचा अंदाज

टीम अॅग्रोवन

पुणे: अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून वाहणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे राज्याच्या कमाल तापमानात घट झाली आहे. पूर्व आणि पश्‍चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचा संगम होत असल्याने विदर्भात आज (ता. ८) हलक्या पावसाचा अंदाज आहे. विदर्भ, मराठवाडा व मध्य दक्षिण, मध्य महाराष्ट्रात असलेल्या ढगाळ हवामानामुळे राज्याच्या उकाड्यात मात्र वाढ झाली आहे.  पश्‍चिमी चक्रावाताच्या प्रभावामुळे अरबी समुद्रावरून जोरदार वारे वाहत आहेत. या वाऱ्याबरोबरच बाष्पाचा पुरवठा होत असल्याने राज्यात अंशत: ढगाळ हवामान होत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्राच्या तापमानात घट झाली आहे, तर मराठवाडा आणि विदर्भात कमाल तापमान ३४ अंशांच्या आसपास असल्याने उन्हाचा चटका टिकून आहे. शनिवारी (ता. ७) चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ३५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पावसाला पोषक हवामानामुळे वाशिम, यवतामाळ, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.   शनिवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे २९.८, नगर ३०.८, धुळे ३३.०, जळगाव ३२.२, कोल्हापूर ३१.१, महाबळेश्‍वर २४.९, मालेगाव ३२.२, नाशिक २७.७, निफाड २८.०, सांगली ३३.०, सातारा २९.८, सोलापूर ३४.०, अलिबाग ३१.०, डहाणू २९.९, सांताक्रूझ ३१.०, रत्नागिरी ३०.७, औरं३गाबाद २९.८, परभणी ३३.९, नांदेड ३४.०, अकोला ३४.३, अमरावती ३३.२, बुलडाणा ३०.३, चंद्रपूर ३५.५, गोंदिया ३०.०, नागपूर ३४.८, वर्धा ३४.८.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT