केसर आंबा पाडाला आलाय...
केसर आंबा पाडाला आलाय... 
मुख्य बातम्या

केसर आंबा पाडाला आलाय...

Santosh Munde

औरंगाबाद : आपली चव, गंध आणि रूपाने ग्राहकांना आकर्षित करणारा मराठवाड्याचा केसर आंबा आठवडाभरापासून पाडाला आला आहे. तिसऱ्या व चौथ्या आठवड्यात तो बाजारात दाखल होईल, अशी माहिती केसर आंबा उत्पादकांनी दिली. यंदाही अनेक संकटांच्या मालिकांचा सामना मराठवाड्याच्या केसर आंब्याला करावा लागला. तसे, हेही वर्ष केसर आंबा उत्पादकांसाठी उत्पादनाबाबत पूर्ण समाधानाचे म्हणता येणार नाही. मराठवाड्यात जवळपास १९ हजार हेक्‍टरवर विस्तारलेल्या केसर आंब्याला यंदा मोहराच्या काळात वातावरण बदलाचा सामना करावा लागला. तीन टप्प्यांत आलेल्या मोहरापैकी पहिल्या मोहरावर गारपीट व वाईट वातावरणाचा परिणाम झाला. त्यानंतरच्या दोन मोहरांवर आकाशात मिरविणाऱ्या ढगांमुळे भुरीचा प्रादुर्भाव झाला होता. तो निस्तारला जात नाही तोच फेब्रुवारीच्या मध्यान्हात गारपिटीने केसरवर आघात केला. या सर्व संकटानंतरही केसरचे किमान ३० ते ४० टक्‍के उत्पादन हाती येईल अशी आशा असतानाच पुन्हा वादळ, पाउस व वाढत्या तापमानाची संकट केसरवर आली.  अलीकडे जवळपास ४३ अंशांपर्यंत गेलेल्या तापमानामुळे मोठ्या प्रमाणात सनस्ट्रोकचा फटका केसरला चारही दिशांनी बसला. जवळपास दोन ते तीन टक्‍क्‍यांपर्यंत तापमानवाढीचे परिणाम केसरच्या नुकसानीत दिसून आल्याचे उत्पादक सांगतात. हंगामात केसरचे १० ते २० टक्‍क्‍यांपर्यंत उत्पादन होण्याचा अंदाज काही शेतकऱ्यांनी व्यक्‍त केला आहे. जवळपास आठवडाभरापासून मराठवाड्याचा केसर पाडला आला आहे. काही उत्पादकांनी कच्च्या आंब्यांची विक्रीही सुरू केली आहे. जागेवरून ६० ते ७० रुपये प्रतिकिलोचे दर कच्च्या केसर आंब्याला मिळत असून, बाजारात आंब्याचे दर ७० ते १०० रुपये प्रतिकिलोपर्यंत असल्याचे उत्पादकांनी सांगितले.  आठवड्यापासून केसर पाडाला आलाय. जाग्यावरून कच्चे आंबे ६० ते ७० रुपये प्रतिकिलोने देतोय. रमजान आणि अधिकचा महिना यंदा उत्पादन कमी झाले तरी दर मिळवून देण्यात फायदेशीर ठरतील.  - मिठू चव्हाण, शेतकरी, सुलतानपूर, जि. औरंगाबाद.

केसरवर कमालीची संकट आली. पण त्यातूनही जो बचावला तो पाडाला आलायं. पुढच्या आठवड्यात त्याची चव चाखायला मिळेल अशी आशा आहे. - शहादेव ढाकणे, शेतकरी, देवगाव, ता. पैठण, जि. औरंगाबाद. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT