मराठवाड्यात रब्बीवर संकटाचे ढग
मराठवाड्यात रब्बीवर संकटाचे ढग 
मुख्य बातम्या

पावसाअभावी मराठवाड्यात रब्बीवर संकटाचे ढग

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : लवकरच बस्तान गुंडाळलेला मोसमी पाऊस व परतीच्या पावसाची अजूनही न झालेली कृपा यामुळे मराठवाड्यातील प्रस्तावित खरिपावरही संकटाचे ढग गडद झाले आहेत. त्यामुळे खरिपात मोठा फटका बसलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या नजरा रब्बीच्या दृष्टिने ‘येरे...येरे... परतीच्या पावसा’ म्हणत आकाशाकडे लागल्याचे चित्र आहे.

कृषी विभागाच्या वतीने यंदा रब्बी पेरणीची तयारी करताना मराठवाड्यात सुमारे २० लाख ७० हजार हेक्‍टरवर रब्बीची पेरणी प्रस्तावित करण्यात आली आहे. प्रस्तावित पेरणीच्या तयारीच्या अनुषंगाने कृषी विभागाकडून नियोजनही करण्यात आले आहे. परंतु, केलेल्या नियोजनाची सारी भीस्त आता मराठवाड्यात येणाऱ्या परतीच्या पावसावर येऊन ठेपली आहे.

प्राप्त माहितीनुसार मराठवाड्यातील ७६ तालुक्‍यांपैकी १३ तालुक्‍यांत आजपर्यंत वार्षिक सरासरीच्या तुलनेत ५० टक्‍केही पाऊस पडला नाही. त्यामध्ये औरंगाबाद तीन, नांदेडमधील १, बीडमधील ५, लातूरमधील १, उस्मानाबादमधील ३ तालुक्‍यांचा समावेश आहे. शिवाय वार्षिक सरासरीच्या तुलनेत ५० ते ६० टक्‍के पाऊस पडलेल्या तालुक्‍यांची संख्यांही मोठी आहे. एकूण ४२१ मंडळांपैकी १२५ मंडळांत आजपर्यंत ५० टक्‍यांच्या आत पाऊस पडला आहे. तर १५४ मंडळांत सरासरीच्या तुलनेत ५० ते ७० टक्‍के पाऊस पडला आहे. ५० टक्‍क्‍यांच्या आत पाऊस पडलेल्या मंडळांत औरंगाबाद २८, जालना १५, परभणी ७, हिंगोली ४, नांदेड १०, बीड ३६, लातूर १० तर उस्मानाबाद १५ मंडळांचा समावेश आहे.

२० सप्टेबरपर्यंत मराठवाड्यातील केवळ ४९ मंडळांतच वार्षिक सरासरीच्या पुढे जाऊन पाऊस झाला होता. साधारणत: यातील काळी खोल, मध्यम व हलकी अशा जमिनीची प्रतवारी करता आता ५० टक्‍केही पाऊस न पडलेल्या जमिनीमध्ये परतीचा पाऊस सरासरी किमान ५० ते ६० मिलिमीटर पडला तरी रब्बीची पेरणी करणे जोखमीचे ठरणार आहे. अर्थात परतीचा पाऊस अपेक्षेनुरूप बरसला तर काळ्या खोल मध्यम व भारी जमिनीत रब्बीची आशा करता येऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

आजपर्यंतचा पडलेला पाऊस पाहता यंदा रब्बीची वाट अवघड आहे. अत्यल्प पावसामुळे मुळात जमिनीत ओलावा कमी असल्याने परतीचा पाऊस अपेक्षेनुरूप बरसला तर खूप खोल काळी व मध्यम भारी जमिनीत रब्बीची आशा करता येईल. हलक्‍या जमिनीत मात्र, अशा परिस्थितीत रब्बीची पेरणी करणे जोखमीचे ठरू शकते. - डॉ. सय्यद ईस्माईल, विभाग प्रमुख, मृदविज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग, वनामकृवि परभणी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT