मुंबईत आजपासून मराठी शेतकरी साहित्य संमेलन
मुंबईत आजपासून मराठी शेतकरी साहित्य संमेलन 
मुख्य बातम्या

मुंबईत आजपासून मराठी शेतकरी साहित्य संमेलन

टीम अॅग्रोवन

संमेलनाध्यक्षपदी डॉ. विट्ठल वाघ; मकरंद अनासपुरे करणार उद्‌घाटन मुंबई : कृषिजगताला भेडसावणाऱ्या समस्यांची मराठी साहित्यविश्वासोबत सांगड घालण्यासाठी, नवसाहित्यिकांना सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या शेती अर्थशास्त्र व नवतंत्रज्ञानाच्या जाणिवा समृद्ध करणे आणि सर्जनशील साहित्यिकांची नवीन पिढी निर्माण करण्यासाठी आज (ता. ३१)पासून येथे चौथे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. येथील पु. ल. देशपांडे कला अकादमी, रवींद्र नाट्यमंदिर (प्रभादेवी, दादर) येथे होत असलेल्या संमेलनाचे उद्‍घाटन सिनेकलाकार मकरंद अनासपुरे यांचे हस्ते होणार असून, अध्यक्षस्थान ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक कवी डॉ. विठ्ठल वाघ भूषविणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून सरोजताई काशीकर अाणि ज्येष्ठ शेतकरी नेते रामचंद्रबापू पाटील उपस्थित राहणार आहेत. स्वागताध्यक्ष अभिजित फाळके, तर कार्याध्यक्ष गंगाधर मुटे आहेत. संमेलनात “आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि स्वामिनाथन आयोग”, "आलं वरिस राबूनं, आम्ही मरावं किती?", “शेतकरीविरोधी कायद्यांचे जंगल”, “चला पुन्हा आयुष्याच्या पेटवू मशाली”, अशा विविध विषयांवरील एकूण ४ परिसंवाद, शेतकरी कवी संमेलन आणि शेतकरी गझल मुशायरा असे सत्र आहेत. काळ्या मातीशी इमान राखणारे लेखन करायचे असेल तर सर्जनशीलतेला पहिल्यांदा भ्रामक कल्पनांतून बाहेर काढले पाहिजे. लेखनशैलीचा उपजतपणा, स्फूर्ती, प्रतिभा व परकाया प्रवेश वगैरे कल्पनांना टाळून कृत्रिम का होईना, पण वास्तवाला चितारणारी अभ्यासपूर्ण लेखनशैली जाणीवपूर्वक विकसित करण्यासाठी या संमेलनाचे प्रयोजन आहे. संमेलनात १००० पेक्षा जास्त मराठी भाषिक प्रतिनिधी, नामवंत साहित्यिक व ज्येष्ठ विचारवंत सहभागी होणार आहेत. संमेलनाच्या आयोजनासाठी नियोजन समिती, व्यवस्थापन समिती, आयोजन समिती, स्वागत समिती आणि सल्लागार समिती अशा पाच समित्या गठित करण्यात आल्या असून, या समित्यांचे अध्यक्ष म्हणून अनुक्रमे प्रा. भुपेश मुडे, प्रा. रमेश झाडे, प्रा. कुशल मुडे, जनार्दन म्हात्रे आणि ॲड. सतीश बोरुळकर यांची निवड करण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT