Many farmers are deprived of fruit crop insurance due to errors 
मुख्य बातम्या

`त्रुटींमुळे अनेक शेतकरी फळपीक विम्यापासून वंचित`

जालना ः फळपीक विमा योजनेत असलेल्या अनेक त्रुटीनी शेतकऱ्यांना विमा उतरविण्यापासून वंचित ठेवले.

टीम अॅग्रोवन

जालना ः फळपीक विमा योजनेत असलेल्या अनेक त्रुटीनी शेतकऱ्यांना विमा उतरविण्यापासून वंचित ठेवले. या त्रुटी दूर करून विमा भरण्यापासून वंचित राहिलेल्या असंख्य शेतकऱ्यांसाठी या योजनेस मुदतवाढ द्यावी, अशी मागणी ॲग्रोव्हिजन गटशेती संघाचे प्रमुख संजय दमोतराव मोरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

मोरे यांच्या निवेदनानुसार हवामान आधारित फळपीक विमा योजनेत अनेक त्रुटी आहेत. प्रधानमंत्री फळपीक विमा योजनेत आपल्या फळपिकांचा विमा उतरविण्याचा ३१ डिसेंबर हा शेवटचा दिवस होता. फळपिकाला सर्वात जास्त धोका हा गारपिटीपासून आहे.

पीक गारपिटीपासून संरक्षित करण्यासाठी या योजनेत अतिरिक्त रक्कम भरावी लागते. ती रक्कम भरण्यास शेतकरी तयारही आहे. परंतु सदरील संकेत स्थळावर ही रक्कम भरण्यासाठी आवश्यक रकानाच उपलब्ध नाही. 

‘तापमानाचे प्रमाणक चुकीचे’ 

याशिवाय ३१ मार्च पर्यंतच दिलेले ४० अंश सेल्सिअस तापमानाचे प्रमाणक सुद्धा चुकीचे आहे. खऱ्या तापमानाचा पारा हा मे महिन्यात वाढत असल्याने या प्रमाणकात बदल करून पूर्वी प्रमाणेच ३१ मे पर्यंत त्याचा कालावधी असावा, असे शेतकरी मोरे यांनी म्हटले आहे. संकटे सांगून येत नाहीत. संकट काळात फळपीक विमा योजनाच शेतकऱ्यांना एक आधार ठरू शकते, अशी मागणी निवेदनातून केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tur Dharwad Method: तूर लागवडीची धारवाड पद्धत, हेक्टरी उत्पादन थेट २५-२६ क्विंटलपर्यंत!

Inspirational Story: गावाच्या पाणी प्रश्‍नासाठी झगडणारा सुनील

Crop Damage Compensation GR: चार जिल्ह्यांतील २२ हजार शेतकऱ्यांना दिलासा; मार्चमधील 'अवकाळी'च्या नुकसानीपोटी १६ कोटी मदत मंजूर

Krishna River: कृष्णा नदीत रविवारपर्यंत उपसाबंदी

Agrowon Podcast: काकडीला उठाव कायम; सोयाबीनमध्ये घट, कापसात चढ उतार, गव्हाचा भाव स्थिर, केळीला उठाव

SCROLL FOR NEXT