PMFBY Scheme: प्रधानमंत्री खरीप पीकविमा योजनेला खानदेशात यंदा कमी प्रतिसाद मिळाला आहे. परतावे न मिळणे, विमा कंपनीची मनमानी आदी कारणांनी या योजनेकडे यंदा अनेकांनी पाठ फिरविल्याची स्थिती आहे. उंबरठा उत्पादन व अन्य अनेक परिमाणके या पीकविमा योजनेसंबंधी आहेत. एक रुपयात पीकविमा योजना बंद झाली. .आता शेतकऱ्यांना विमा हप्ता विविध पिकांच्या विमा संरक्षणासाठी भरायचा आहे. परंतु या योजनेतून मागील वेळेस परतावे अनेकांना मिळाले नाहीत. दुष्काळी स्थिती होती. परंतु उंबरठा उत्पादनाचा निकष व अन्य परिमाणकांमुळे कापूस, सोयाबीन व अन्य पिकांसंबंधी नुकसान होवूनही परतावे मिळाले नाहीत. शासन या योजनेचा गवगवा करते, परंतु भरपाई मिळत नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे असून, यंदा अनेकांनी योजनेकडे पाठ फिरविली आहे..Crop Insurance Model: ‘पॅरामेट्रिक’ पीकविमा योजना राबवा.नंदुरबारात मागील वर्षी २५ हजारांवर शेतकरी या योजनेत सहभागी झाले होते. यंदा सुमारे पाच हजार शेतकरी सहभागी झाले आहेत. जळगाव जिल्ह्यात मागील वेळेस लाखभर शेतकरी योजनेत सहभागी झाले होते. यंदा आतापर्यंत सुमारे १५ हजार शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग नोंदविला आहे. धुळ्यात सुमारे २१ हजार शेतकऱ्यांनी खरिपात विविध पिकांसाठी विमा संरक्षण घेतले होते. यंदा नऊ हजार शेतकरी योजनेत सहभागी झाले आहेत..मागील वेळेस अधिक पावसाची स्थिती होती. कापूस, सोयाबीनची हानी किडींमुळे झाली होती. परंतु या योजनेत किडींमुळे होणाऱ्या नुकसानीबाबत परतावे मिळत नाहीत. अतिवृष्टी व दुष्काळ यासंबंधी नुकसान भरपाई दिली जाते. त्यात उंबरठा उत्पादन कसे आहे, यावरही परतावे देण्यासंबंधी कार्यवाही केली जाते..Crop Insurance Scheme: पीकविमा शेतकऱ्यांच्या अपेक्षांपासून दूर.उंबरठा उत्पादनाच्या निकषात विमाधारक परताव्यांसाठी पात्र ठरले नाहीत. खानदेशात कापूस पिकासाठी सर्वाधिक विमा संरक्षण घेणारे शेतकरी आहेत. त्यापाठोपाठ सोयाबीन पिकासंबंधी विमा संरक्षण घेतले जाते. कापसाची खानदेशात सर्वाधिक साडेआठ लाख हेक्टरवर लागवड केली जाते. परंतु या सर्व क्षेत्रासाठी विमा संरक्षण यंदा घेतले जाणार नाही, अशी स्थिती आहे..शेतकरी व्यस्तविमा योजनेत सहभागासाठी तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. बँका, सीएससी केंद्रांत गर्दी असते. यात सध्या सततच्या पावसाने शेतात तण वाढले आहे. अन्य कामेही रखडली आहेत. ती उरकून घेण्यास सध्या अनेकांनी प्राधान्य दिले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.