PM Narendra Modi Announcement: दिल्लीत सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे. पेपरफुटी प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा देण्यासाठी जलदगती न्यायालये स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. देशातील तरुणांचे हित आणि त्यांचे भविष्य यालाच आमचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे..नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांचे तीव्र आंदोलन सुरु आहे. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत असून, त्यांची व्याप्ती वाढली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. .याबाबत पंतप्रधान मोदी यांनी 'एक्स' या समाज माध्यमावर पोस्ट केली आहे. ''सर्व पेपरफुटी प्रकरणांतील दोषींना जलद आणि कठोर शिक्षा देण्यासाठी जलदगती न्यायालये स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत आवश्यक कार्यवाही सुनिश्चित करण्यासाठी संबंधित विभागांना आणि अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत.'' असे मोदी यांनी म्हटले आहे..Parliament Monsoon Session 2026: संसदेच्या आवारात विरोधक- सत्ताधारी आमने- सामने, लोकसभा, राज्यसभेचे कामकाज सलग चौथ्या दिवशी ठप्प.विद्यार्थ्यांचे हित जपण्यासाठी केंद्र सरकारकडून घेतलेल्या निर्णयांमधील हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला सोडले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. .Rahul Gandhi: दहा वर्षांत १५२ पेपरफुटीची प्रकरणे, तरीही एकाही दोषीला शिक्षा का नाही? राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल.अमित शहा काय म्हणाले?पंतप्रधान मोदींच्या या निर्णयाच्या समर्थनार्थ गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे की तरुणांचे हित आणि त्यांचे उज्ज्वल भविष्य यालाच मोदी सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे आणि संकल्पदेखील आहे. पेपरफुटीच्या प्रकरणात दोषींना कठोर शिक्षा व्हावी आणि जलद सुनावणीसाठी पंतप्रधानांनी जलदगती न्यायालये स्थापन करण्याचा घेतलेला निर्णय याचेच हे प्रतिबिंब आहे, असे शहा यांनी नमूद केले आहे. .'तुम्ही तरुणांच्या भविष्याचे सर्वात जास्त नुकसान केले', राहुल गांधींचा मोदींवर निशाणा पंतप्रधान मोदींच्या या निर्णयावरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जोरदार निशाणा साधला आहे. या संकटाच्या परिस्थितीला त्यांनी थेट पंतप्रधानांना जबाबदार धरले आहे. ''तुम्ही आमच्या तरुणांच्या भविष्याचे सर्वात जास्त नुकसान केले आहे. तुम्ही देशातील शिक्षण व्यवस्थेवर संपूर्ण कब्जा मिळवला आणि ती उद्ध्वस्त केली आणि त्यासाठी पाठबळ दिले. तसेच त्यासाठी जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला संरक्षण दिले,'' असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. धमेंद्र प्रधान यांना पदावरुन हटवावे, विद्यार्थ्यांची माफी मागावी आणि विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करावी, या विद्यार्थ्यांच्या स्पष्ट मागण्या असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.