Low Rainfall Impacts: खानदेशात ज्वारीची पेरणी यंदा कमी झाली आहे. ज्वारीला मागील वेळेस किंवा मार्च ते जून दरम्यान दर कमी मिळाले. शिवाय यंदा कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. यात ज्वारी पीक परवडणार नाही, या विचारातून शेतकऱ्यांनी ज्वारी पेरणी कमी केली आहे. ज्वारीची पेरणी रब्बीत वाढली होती. हरभऱ्यानंतर ज्वारीची पेरणी झाली होती. .ज्वारीला चांगले दर मिळतील, अशी अपेक्षा होती. परंतु ज्वारी दर मार्च ते जून या कालावधीत कमी होते. कमाल दर २५०० रुपये प्रतिक्विंटल, असा ज्वारीस मिळाला. चाऱ्याचे दरही हवे तसे नव्हते. दुसरीकडे मक्याचे दर टिकून राहीले. मका उत्पादनदेखील रब्बीत बऱ्यापैकी आले. सोयाबीन पीकही मागील वेळेस अन्य पिकांच्या तुलनेत अनेकांना परवडले होते..Soybean Sowing Update: खानदेशात सोयाबीनचे क्षेत्र वाढले .यंदा कमी पाऊस येईल, असेही संकेत, भाकीत हवामानशास्त्र विभागाने केले होते. यामुळे यंदा अनेकांनी ज्वारीची पेरणी टाळली. खानदेशात पूर्वी कापसानंतर ज्वारीची पेरणी केली जात होती. जळगाव जिल्ह्यात ज्वारीची पेरणी ७० ते ७५ हजार हेक्टरवर असायची. परंतु यंदा ज्वारीची पेरणी ४२ हजार हेक्टरवरदेखील झालेली नाही. खानदेशात ज्वारीची पेरणी दीड लाख हेक्टरवर अपेक्षित होती..Khandesh Sowing Update: खानदेशात २५ टक्के पेरण्या; कापूस लागवड अपेक्षेपेक्षा कमी.परंतु ज्वारी पेरणी ८० हजार हेक्टरवरदेखील झालेली नाही. ज्वारीचे अतिपावसात किंवा परतीच्या पावसात नुकसान होते. अनेक भागात मका, सोयाबीन पेरणीचे अनेक शेतकऱ्यांचे नियोजन यशस्वी झाले. ज्वारीची पेरणी चाऱ्यासाठी अधिक शेतकरी करतात. परंतु मका व सोयाबीनपासूनही चारा उपलब्ध होतो, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे..मका पिकास पसंतीमका लागवडीत यंदा वाढ झाली आहे. मक्याची एकट्या जळगाव जिल्ह्यात एक लाख हेक्टरवर लागवड झाली आहे. तसेच सोयाबीन पेरणीतही सुमारे २० टक्के वाढ झाली आहे. जळगाव जिल्ह्यात सोयाबीनची पेरणी २८ हजार हेक्टरवर अपेक्षित होती. परंतु पेरणी ३४ हजार हेक्टरपेक्षा अधिकच्या क्षेत्रात झाली आहे. धुळे व नंदुरबारातही काळ्या कसदार जमिनीच्या क्षेत्रात तसेच तापी, सुसरी, गोमाई, अनेर, पांझरा नदीच्या लाभक्षेत्रात मका, सोयाबीन पीक क्षेत्र वाढले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.