mango export
mango export  
मुख्य बातम्या

अर्जेंटिनाला होणार आंबा निर्यात

गणेश कोरे

पुणे : कोकणातील हापूस आणि मराठवाड्यातील केशर आंब्याच्या अर्जेंटिनाच्या निर्यातीचा मार्ग मोकळा झाला आहे. या संदर्भात सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आले असून, एप्रिल-मे महिन्यामध्ये पहिली कन्साईन्मेंट पाठविणार असल्याची माहिती राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी `ॲग्रोवन`ला दिली. 

याबाबत पवार म्हणाले, ‘‘राज्यातील फळ भाजीपाल्याला जागतिक बाजारपेठ मिळावी, यासाठी पणन मंडळ सातत्याने प्रयत्नशील आहे. यासाठी कृषी हवामान विभागनिहाय विविध जिल्‍ह्यांमध्ये निर्यात सुविधा केंद्रे उभारण्यात आली आहे. या माध्यमातून विविध फळे भाजीपाला विविध देशांमध्ये निर्यात केला जात आहे. आगामी हापूस आंब्याच्या हंगामासाठी निर्यातीची प्रक्रिया सुरू झाली असून, यंदा अर्जेंटिना या देशात निर्यात करण्यात येणार आहे.’’ 

‘‘गेल्या वर्षी मुंबईमध्ये अर्जेंटिना दूतावासाने आयोजित झालेल्या आंतरराष्ट्रीय व्यवसाय परिषदेमध्ये अर्जेंटिनाच्या राष्ट्राध्यक्षांसह ४० आयातदार सहभागी झाले होते. या वेळी या आयातदारांना महाराष्ट्रातील फळे भाजीपाल्यांबाबत सादरीकरणासह निर्यात सुविधा केंद्रांची माहिती देण्यात आली होती. यानुसार यंदाच्या हापूस आणि केशर आंब्याच्या निर्यातीसाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्जेंटिना सरकारने विकीकरण सुविधेची मागणी केली असून, ती सुविधा वाशी येथे असल्यामुळे या हंगामात पहिली कन्साईनमेंट पाठवली जाईल,’’ असे पवार यांनी सांगितले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT