दुष्काळी स्थितीत फळबागांचे व्यवस्थापन करा
दुष्काळी स्थितीत फळबागांचे व्यवस्थापन करा 
मुख्य बातम्या

दुष्काळी स्थितीत फळबागांचे व्यवस्थापन करा

टीम अॅग्रोवन

पुणे : यंदा कमी झालेल्या पावसामुळे पुणे विभागात दुष्काळजन्य परिस्थिती तयार झाली आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी न घेतल्यास फळबागेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. दुष्काळी स्थितीमध्ये फळबागांचे व्यवस्थापन करताना सूक्ष्म सिंचन, मटका सिंचन पद्धत, पाॅलिथिन आच्छादन अशा विविध पद्धतींचा वापर करण्याचे आवाहन पुणे विभागाचे विभागीय कृषी सहसंचालकांनी केले. 

 राज्याचे ढोबळमानाने कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ असे चार विभाग पडतात. यामध्ये कोकण विभागात आंबा, काजू, नारळ, चिकू, सुपारी, पश्चिम महाराष्ट्रात केळी, पपई, पेरू, द्राक्ष, डाळिंब, सीताफळ, लिंबू, मराठवाडा विभागात मोसंबी, लिंबू , डाळिंब, आंबा, सीताफळ विदर्भात संत्रा, मोसबी, लिंबू, आंबा, सीताफळ, केळी, बोर, डाळिंब, पेरू, आवळा, पपई फळपिकांचे प्रामुख्याने उत्पादन घेतले जाते. यंदा कमी झालेल्या पावसामुळे खरीप हंगामापाठोपाठ रब्बी हंगामाही वाया जाण्याची शक्यता आहे. उन्हाळ्यातही पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न गंभीर बनणार आहे. यामुळे शेतीवर परिणाम झाला असून अशा दुष्काळी परिस्थितीत फळपिके जगविणे मोठे आव्हान उभे राहणार आहे. या आव्हानाला तोंड देण्यासाठी शेतकऱ्यांनी आत्तापासून उपाययोजना करण्याची गरज आहे. 

उन्हाळ्यात किंवा दुष्काळ सदृश काळात फळबागा वाचविण्यासाठी सूक्ष्म सिंचन मुख्यत ठिबक पद्धतीचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे. यामध्ये पारंपरिक पद्धतीपेक्षा ५० ते ६० टक्के पाणी बचत होते. शिवाय दर्जेदार व अधिक उत्पादन मिळते. तसेच मजुरांवरील व खतावरील खर्च कमी होतो. यामुळे शेतकरी बंधूंनी सूक्ष्म सिंचनपद्धतीचा वापर करावा व कमीतकमी पाण्यामध्ये आपल्या फळबागा टिकवाव्यात. याशिवाय प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना प्रतिथेंब अधिक पीक या योजनेअंतर्गत अल्प, अत्यल्प अनुसूचित जाती - जमाती या शेतकऱ्यांना एकूण खर्चाच्या ५५ टक्के अनुदान व इतर शेतकऱ्यांना ४५ टक्के अनुदान सूक्ष्म सिंचनासाठी देण्यात येते. 

अशा करा उपाययोजना मटका सिंचन पद्धत, आच्छादनाचा वापर, बाष्परोधकाचा वापर, झाडाची छाटणी, झाडाचे छत्र व्यवस्थापन, झाडांवरील पानोळा कमी करावा (डिव्होलिएशन), जमिनीत पाणी धरून ठेवणाऱ्या घटकांचा वापर करावा, नवीन झाडाकरिता सावली करावी, शेततळ्यातील पाण्याचा योग्य पद्धतीने वापर अशा विविध पद्धतींचा अवलंब करून फळबागा जगविण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पुणे विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक दिलीप झेंडे यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT