Make meticulous planning for farmer group formation: Shanmugarajan S. 
मुख्य बातम्या

शेतकरी गट निर्मितीसाठी सुक्ष्म नियोजन करा : षण्मुगराजन एस

वाशीम : ‘‘प्रत्येक शेतकरी हा कोणत्याही एका शेतकरी गटाचा सदस्य असावा, यादृष्टीने नियोजन करून शेतकरी गट निर्मितीस चालना द्यावी’’, अशी सूचना जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिली.

टीम अॅग्रोवन

वाशीम : ‘‘‘आत्मा’च्या माध्यमातून शेतकरी गट निर्मितीला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. शेतकरी गटाद्वारे शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन शेतीसाठी लागणारी यंत्र सामुग्री, बियाणे, खते खरेदी केल्यास उत्पादन खर्चात बचत होते. त्यामुळे प्रत्येक शेतकरी हा कोणत्याही एका शेतकरी गटाचा सदस्य असावा, यादृष्टीने नियोजन करून शेतकरी गट निर्मितीस चालना द्यावी’’, अशी सूचना जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिली. 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मंगळवारी (ता.३) आयोजित कृषी विभागाच्या विविध योजना तसेच ‘आत्मा’ नियामक मंडळाच्या आढावा सभेत ते बोलत होते. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा कृषी विकास अधिकारी श्री. बन्सोड, पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. बी. एस. बोरकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद वानखेडे, ‘नाबार्ड’चे जिल्हा व्यवस्थापक विजय खंडरे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर, प्रभारी जिल्हा समाज कल्याण अधिकारी अंबादास मानकर उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी फळबाग लागवडीला चालना देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत यंदा १७२० हेक्टर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. ते लवकर पूर्ण करावे. इतर पिकांच्या तुलनेत फळबाग लागवडीतून शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळते,  असे षण्मुगराजन एस. यांनी सांगितले.   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT