Maize became the major crop in Nashik district 
मुख्य बातम्या

मका बनले नाशिक जिल्ह्यातील प्रमुख पीक

येवला : कांद्याचा अन् द्राक्षाचा जिल्हा अशी जिल्ह्याची ओळख सर्वदूर आहेच पण आता हाच जिल्हा मकाचे सर्वाधिक पीक घेणारा जिल्हा म्हणूनही ओळखला जाऊ लागला आहे.

टीम अॅग्रोवन

येवला : कांद्याचा अन् द्राक्षाचा जिल्हा अशी जिल्ह्याची ओळख सर्वदूर आहेच पण आता हाच जिल्हा मकाचे सर्वाधिक पीक घेणारा जिल्हा म्हणूनही ओळखला जाऊ लागला आहे. यंदाच्या खरिपातील पाच लाख ६९ हजार हेक्‍टरवरील पेरणीपैकी तब्बल सव्वादोन लाख हेक्‍टर क्षेत्र मकाच्या पिकाखाली गुंतले आहे. कमी भांडवल, मर्यादित श्रम अन अधिक उत्पन्न देणारे पीक म्हणून मक्याला जिल्ह्यातील दहा तालुक्यांत सर्वाधिक पसंती मिळत आहे.

जिल्ह्यातील पीक पॅटर्न गेल्या दोन-तीन वर्षापासून बदलत असून यामध्ये मोठा बदल म्हणजे बाजरी, डाळी व तेलबियाचे क्षेत्र निम्य्याने घटले आहे. याची जागा मकासह कांदा व भाजीपाला पिकाने घेतली आहे. विशेषतः सर्वाधिक क्षेत्र मक्याखाली गुंतवले जात आहे. प्रचंड प्रमाणात वाढलेले पोल्ट्री व स्टार्च उद्योगामुळे मक्याची मागणी वाढली आहे. या दोन्ही उद्योगांसाठी सांगली, सातारा, शिरपूर, दोंडाईचा येथे मागणी आहेच. पण, गुजरात, तामिळनाडू, हरियाणा, पंजाब आदी राज्यात व युक्रेन, मलेशिया, व्हीएतनाम येथेही मोठ्या प्रमाणात मका निर्यात होतो.

मक्याची सर्वाधिक लागवड येवला तालुक्यात झाली. त्याखालोखाल मालेगाव, बागलाण व नांदगावमध्ये मक्याखालील क्षेत्र गुंतले आहे. तर, नाशिक, दिंडोरी, निफाडमध्ये अपेक्षेपेक्षा लागवड घटल्याचे आकडे सांगतात. एकरी ३० ते ४०, तर सरासरी ३३ क्विंटल उत्पन्न निघते. सरासरी ५० ते ६० हजाराचे उत्पन्न एका एकरातून मिळते. यातील सुमारे २० ते २५ हजाराचा खर्च जातो. तर, अंदाजे ३० ते ४० हजार रुपये शेतकऱ्यांच्या हातात राहतात. 

परवडणारा भाव, कमी उत्पादन खर्च आणि केव्हाही पीक विक्रीचा पर्याय, हमीभावाने होणारी खरेदी या कारणांमुळे शेतकरी मक्याकडे वळले आहेत.

- गोरख भागवत, मका व्यापारी, येवला.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing Planning: दारव्हा तालुक्यात ६९ हजार हेक्टरवर खरिपाचे नियोजन

Illegal HTBT Cotton Seeds: वर्ध्यात एचटीबीटी कापूस बियाण्यांचा साठा जप्त

El Nino Preparedness Guidance: ‘एल निनो’वर मात करण्यासाठी समन्वयाची गरज : प्रा. डॉ. इंद्र मणी

Agriculture Inputs Shortage: कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून युरिया, डीएपीची कृत्रिम टंचाई

BBF Planter: वेळ, मजुरी आणि खर्चात बचत करणारे बीबीएफ पेरणी यंत्र

SCROLL FOR NEXT