राज्यात कोरोनाग्रस्त पुन्हा वाढले; ३२८ नवीन रुग्णांचे निदान
राज्यात कोरोनाग्रस्त पुन्हा वाढले; ३२८ नवीन रुग्णांचे निदान 
मुख्य बातम्या

राज्यात कोरोनाग्रस्त पुन्हा वाढले; ३२८ नवीन रुग्णांचे निदान

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यातील नव्या रुग्णांची संख्या घटत असल्याचे चित्र निर्माण होत असतानाच शनिवारी (ता.१९) राज्यात कोरोनाबाधित ३२८ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ३६४८ झाली आहे. शनिवारी दिवसभरात ३४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आत्तापर्यंत राज्यभरात ३६५ रुग्ण बरे झाले आहेत. आज राज्यात ११ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात सध्या एकूण ३०७२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शनिवार (ता.१९) पर्यंत पाठविण्यात आलेल्या ६७, ४६८ नमुन्यांपैकी ६३, ४७६ जणांचे कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ८२,२९९ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ६,९९९ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात ११ करोना बाधित रुग्णांचा शनिवारी मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २११ झाली आहे. (या पूर्वी ११ एप्रिलला कळवलेला एक मृत्यू कोरोना निगेटिव्ह असल्याचे मुंबई मनपाने कळवल्याने सदर मृत्यू एकूण मृत्यूमधून वगळण्यात आला आहे). शनिवारी झालेल्या मृत्यूंपैकी मुंबईतील पाच, पुण्यातील चार, औरंगाबादमधील एकाचा आणि ठाण्यातील एकाचा समावेश आहे. त्यात ६ पुरुष तर ५ महिला आहेत. त्यामध्ये ६० वर्षे किंवा त्यावरील पाच रुग्ण आहेत तर सहा रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० या वयोगटातील आहेत. मृत्यूमुखी पडलेल्या ११ जणांपैकी ९ रुग्णांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT