'Mahanand Ghee' to visit Gulf countries: President Deshmukh 
मुख्य बातम्या

‘महानंद घी’ आखाती देशांमध्ये जाणार : अध्यक्ष देशमुख 

‘महानंद’ने तयार केलेला ‘महानंद घी’ हा ब्रँड सात आखाती देशांमध्ये जाणार आहे. मार्चपर्यंत २७ टन तूप पाठविले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात २ टन तूप ३१ जानेवारी रोजी पाठविले जाणार आहे.

टीम अॅग्रोवन

मुंबई : ‘महानंद’ने तयार केलेला ‘महानंद घी’ हा ब्रँड सात आखाती देशांमध्ये जाणार आहे. मार्चपर्यंत २७ टन तूप पाठविले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात २ टन तूप ३१ जानेवारी रोजी पाठविले जाणार आहे. महानंदचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांच्या हस्ते या निर्यातीचा प्रारंभ करण्यात आला. या कार्यक्रमासाठी पशूसंवर्धन व दुग्धविकासमंत्री सुनील केदार आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर दूरदृश्यप्रणालीद्वारे प्रमुख उपस्थित होते.  अध्यक्ष देशमुख म्हणाले, ‘‘महानंद दुग्धशाळेचे तूप दुबई, तसेच मध्य आशियायी या आखाती देशामध्ये निर्यात करण्यात येत असून, ही बाब महानंद दुग्धशाळा व दूध महासंघासाठी सुवर्ण मानबिंदू आहे. हे तूप महानंद दुग्धशाळेचे निर्यात करण्यासाठी पोर्ट शिपिंग अँड लॉजिस्टिक इंडिया या निर्यातदार संस्थेला नियुक्त केले आहे. एक लिटरचे जार तयार करण्यात आले असून, ते दुबईमध्ये पाठविले जाणार असून, तेथून ते दुबई, संयुक्त अरब अमिरात, कतार, ओमान, जॉर्डन या देशांमध्ये पाठविले जाणार आहे. ३१ मार्चपर्यंत २७ टन तूप निर्यात करण्याची तयारी ‘महानंद’ने केली आहे. एक लिटरचे जार वितरित करण्यासाठी उपयुक्त असल्याने ते पॅकिंग स्वरूपात तयार केले आहे. देशी गायींच्या दुधापासून हे तूप तयार केले असून, आखाती देशांमध्ये त्याला मोठी मागणी आहे.’’ 

दुग्ध उत्पादनात वैविद्य  महानंद दुग्धशाळेचे दुध व दुग्धजन्य पदार्थ राज्यात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. आता आखाती देशांमध्येही निर्यातीचे पाऊल ठेवले आहे. श्रीखंड, आम्रखंड व पनीर ही उत्पादने मोठ्या प्रमाणात विक्री होतात. आता लस्सी, ताक, सुगंधी दूध, तूप, दही आदी दुग्ध पदार्थांत वैविध्य आणले आहे. या वेळी व्यवस्थापकीय संचालक श्यामसुंदर पाटील, प्रशांत पवार, प्रवीण सांगळी व प्रवीण पवार उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modified Atmosphere Packaging: सुधारित वातावरण पॅकेजिंगच्या क्षमता, गुणधर्म

Onion Price: कांदादरासाठी खणखणले फोन; मंत्री, लोकप्रतिनिधी जेरीस

Agriculture Scientists: शास्त्रज्ञ पोहोचले शेतकऱ्यांच्या बांधावर

NCCF: ‘एनसीसीएफ’चे शाखा व्यवस्थापक ग्रोवर निलंबित

Agriculture Policy: केंद्राच्या धोरणांचा व्यापाऱ्यांनाही फटका

SCROLL FOR NEXT