महाबीजचा २८ हजार हेक्टरवर बीजोत्पादन कार्यक्रम
महाबीजचा २८ हजार हेक्टरवर बीजोत्पादन कार्यक्रम 
मुख्य बातम्या

महाबीजचा २८ हजार हेक्टरवर बीजोत्पादन कार्यक्रम

टीम अॅग्रोवन

परभणी ः यंदाच्या (२०१९-२०) खरीप हंगामामध्ये महाबीजच्या परभणी विभागांतर्गतच्या सहा जिल्ह्यांमध्ये २८ हजार ५८७ हेक्टरवर बीजोत्पादन कार्यक्रम घेण्यात येत आहे. त्यासाठी ११ हजार ४५९ शेतकऱ्यांनी महाबीजकडे नोंदणी केली आहे. या संदर्भात महाबीजच्या सूत्रांनी माहिती दिली.

महाबीजच्या परभणी विभागांतर्गतच्या परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर या सहा जिल्ह्यांमध्ये यंदाच्या खरीप हंगामामध्ये सोयाबीन, मूग, उडीद, तूर, कपाशी, ज्यूट, बाजरी या पिकांचा मिळून एकूण २८ हजार ५८७ हेक्टरवर बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येत आहे.  

या सहा जिल्ह्यांतील एकूण ११ हजार ४५९ शेतकऱ्यांनी बीजोत्पादन कार्यक्रमासाठी नोंदणी केली आहे. यंदा सोयाबीनचे सर्वाधिक म्हणजे २७ हजार ७३८ हेक्टरवर बीजोत्पादन घेण्यात येत आहे. गतवर्षी २९ हजार ७१६ हेक्टरवर बीजोत्पादन कार्यक्रम घेण्यात आला होता.  

जिल्हानिहाय बीजोत्पादन कार्यक्रम क्षेत्र (हेक्टरमध्ये)
जिल्हा क्षेत्र
परभणी ८९३९
हिंगोली ७५२०
नांदेड १९४५
लातूर ६५९७
उस्मानाबाद ३२०९
सोलापूर ३७९
पीकनिहाय शेतकरी संख्या, बीजोत्पादन क्षेत्र (हेक्टरमध्ये)
पीक शेतकरी संख्या क्षेत्र
सोयाबीन १०९३६ २७७३८
मूग ७९ १३६
उडीद १०५ १८४
तूर २६१ ४०६
ज्यूट ३४ १०५
कापूस ३९ १०
बाजरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT