महाबीज
महाबीज  
मुख्य बातम्या

‘महाबीज’ संचालकपदाचा निकाल २० जानेवारीला

टीम अॅग्रोवन

नागपूर ः महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळावर दोन संचालकपदांसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीतील मतदानाचा टप्पा शनिवारी (ता. १३) आटोपला. आता उमेदवारांना निकालाची प्रतीक्षा असून, २० जानेवारी रोजी विजेत्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. महाबीजच्या कृषक भागधारकांनी संचालक मंडळावर दोन संचालक निवडून द्यावयाचे असतात. त्याकरिता २७ नोव्हेंबर रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार ७ डिसेंबरपर्यंत अकोला व उर्वरित मतदारसंघातून सहा नामांकन अर्ज महाबीजकडे प्राप्त झाले होते. निवडणूक कार्यक्रमानुसार २३ डिसेंबर ते १३ जानेवारीपर्यंत अकोला (विदर्भ विभाग) मतदारसंघ व उर्वरित महाराष्ट्र मतदारसंघातून भागधारकांना मतदानाचा हक्क बजावता येणार होता; परंतु, १४ डिसेंबरपूर्वी उर्वरित महाराष्ट्र संघातून तीन उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने बुलडाणा जिल्ह्यातील वल्लभराव तेजराव देशमुख यांची निवड निश्चित झाली होती. त्यामुळे केवळ एक पदासाठी अकोल्याचे संजय धोत्रे व प्रशांत गावंडे यांच्यात लढत होती. त्याकरिता १३ जानेवारीपर्यंत प्रत्यक्ष तसेच टपाल मतपत्रिकेने मतदान करण्यात आले. मतदानासाठी आज शेवटचा दिवस उरला असून, २० जानेवारी रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.  नऊ जिल्ह्यांतील भागधारकांची मते पेटीबंद उर्वरित महाराष्ट्र मतदारसंघातून वल्लभराव तेजराव देशमुख यांची अविरोध निवड झाली होती. त्यामुळे केवळ अकोला (विदर्भ विभाग) मतदारसंघातील संचालकपदासाठीच्या उमेदवाराची निवड अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशीम, वर्धा, नागपूर, भंडारा, बुलडाणा (खामगाव, नांदुरा) जिल्ह्यांतील २२ हजार ४११ भाग असेलेल्या तीन हजार ४६५ भागधारकांच्या मतांवर अवलंबून होती. टपाल मतपत्रिकेद्वारे मतदान झाले अाहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT