विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरी
विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरी 
मुख्य बातम्या

विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरी

टीम अॅग्रोवन

पंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया एकादशी) राज्याच्या कानाकोपऱ्यातून शनिवारी (ता. १६) चार लाखांपेक्षा अधिक वारकरी पंढरीत दाखल झाले आहेत. टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषाने अवघी पंढरी दुमदुमून गेली आहे. वारीनिमित्त मंदिर समितीच्या वतीने मंदिराच्या गाभाऱ्याला आणि विठ्ठल-रुक्मिणीला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे, त्यामुळे सावळ्या विठुरायाचं रुप आणखीनच लोभस दिसत होतं. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांच्या हस्ते पहाटे सपत्निक श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. आषाढी, कार्तिकीनंतर माघी वारीला महत्त्व आहे. या वारीसाठी शुक्रवारपासूनच पंढरीत राज्यभरातील पालख्या, दिंड्या दाखल होत होत्या, आज त्यात आणखी भर पडली. कालची दशमी आणि आजच्या एकादशीच्या स्नानाला वारकरी संप्रदायात महत्त्व असल्याने पहाटेपासूनच चंद्रभागा नदीवर स्नानासाठी वारकऱ्यांची झुंबड उडाली होती. तसेच श्री विठ्ठलाची पदस्पर्श दर्शनरांग गोपाळपूर रस्त्यावरील मंदिर समितीच्या पत्राशेडपर्यंत गेली. दर्शनासाठी वारकऱ्यांना १० ते १५ तास लागत असल्याचे दिसून आले. दिवसभर एस.टी, रेल्वे आणि खासगी वाहनाने वारकरी पंढरीत दाखल होत होते. चंद्रभागेतील स्नान आणि त्यानंतर प्रदक्षिणा मार्गावरील प्रदक्षिणा वारकरी पूर्ण करत होते.  अनेक संतांच्या दिंड्या भजन गात ही प्रदक्षिणा करत होते, त्यामुळे भक्तीचा एक वेगळाच उत्साह अनुभवास येत होता. मंदिर परिसर, स्टेशन रस्ता, शिवाजी चौक,  प्रदक्षिणा मार्ग व चंद्रभागा वाळवंट परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. शहारातील विविध मंदिरे'' मठ, धर्मशाळा यामध्ये प्रवचन कीर्तन आणि भजनाचे सूर आळवले जात होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT