मुख्य बातम्या

‘माफसू’ची कुलगुरू निवड प्रक्रिया लांबणीवर

टीम अॅग्रोवन

नागपूर ः महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूंच्या निवडीसाठी पाच जणांची शॉर्टलिस्ट करीत ती राज्यपालांना पाठविली जाणार होती. रविवारी (ता. ३) ही प्रक्रिया पार पाडण्याचे प्रस्तावीत असताना, ती अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.   डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा कुलगुरू विदर्भाचा निवडण्यात आला. त्यांनतर आता माफसूकरीतादेखील विदर्भातीलच व्यक्‍ती कुलगुरू असावा, यासाठीच्या घडामोडींना वेग आल्याचे सूत्रे सांगतात. ३ डिसेंबर रोजी १५ उमेदवारांमधून पाच जणांची शॉर्टलिस्ट करून राज्यपाल कार्यालयाकडे पाठविण्याचे प्रस्तावीत होते. त्याकरीता १५ उमेदवारांना ई-मेलद्वारे रविवारी (ता. ३) मुंबईत राहण्याच्या सूचना होत्या. परंतु एेनवेळी ही प्रक्रिया रद्दबातल ठरविण्यात आली. लवकरच नवी तारीख या उमेदवारांना कळविली जाणार आहे. परंतु ही प्रक्रिया का रद्दबातल ठरविली गेली यामागे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.  दहा तारखेच्या आधी होणार प्रक्रिया समिती सदस्यांपैकी एकाच्या सासऱ्याचे निधन झाले. त्यामुळे ही प्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, कुलगुरू निवड समितीमधील सदस्य व पशुसंवर्धन व दुग्धविकास सचिव विकास देशमुख हे ३० डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्याआधी कुलगुरू निवडीची प्रक्रिया पार पडणे गरजेचे आहे. अन्यथा त्याकरिता नवी निवड समिती स्थापन करावी लागणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande : शहाणे करून सोडले, सकळ जण...

Govind Hande : अविरत कर्मयोगी

Wheat Market : विदर्भात गव्हाच्या दरात चढ-उतार

Cotton Productivity : परभणी जिल्ह्यात कापूस रुईचा उतारा हेक्टरी ३ क्विंटल ९८ किलो

Water Scarcity : करकंब परिसरात द्राक्षबागांना टँकरने पाणी

SCROLL FOR NEXT