शासकीय धान्य खरेदीला अल्प प्रतिसाद
शासकीय धान्य खरेदीला अल्प प्रतिसाद 
मुख्य बातम्या

जळगाव जिल्ह्यात शासकीय धान्य खरेदीला अल्प प्रतिसाद

टीम अॅग्रोवन

जळगाव ः जिल्ह्यात शासकीय कडधान्य खरेदीसह तृणधान्य खरेदीला हवा तसा प्रतिसाद अजूनही नाही. सोयाबीनची शून्य क्विंटल आवक झाली आहे. उडीद, मूग खरेदीच्या तीन केंद्रांवर मुगाची मिळून सुमारे १५०० क्विंटलही आवक झालेली नसल्याची माहिती मिळाली.

उडदाची खरेदीही सर्वत्र मिळून १४०० क्विंटलही नाही. उडीद व मुगाची आवक सध्या नसल्याच्या स्थितीत आहे. पाचोरा, अमळनेर व जळगाव येथे उडीद, मूग व सोयाबीनची खरेदी सुरू आहे. ज्वारी व मक्‍याची खरेदी मागील महिन्याच्या मध्यात सुरू झाली. ही खरेदी अजून हवी तशी नाही. नोंदणीला बरा प्रतिसाद मिळाला होता. परंतु नोंदणी केलेल्या सर्वच शेतकऱ्यांनी शासकीय खरेदी केंद्रात ज्वारी व मक्‍याची विक्री केलेली नसल्याचे सांगण्यात आले. कारण ज्यांनी विक्री केली, त्यातील कमाल शेतकऱ्यांचे चुकारे रखडले आहेत.

यामुळे रोखीने पैशांसाठी अनेक शेतकऱ्यांनी बाजार समित्यांमध्ये ज्वारी व मक्‍याची विक्री केली आहे. यामुळे शासकीय खरेदी केंद्रात शुकशुकाट आहे. ज्वारी व मका खरेदीसंबंधी मागील महिन्याच्या मध्यापर्यंत फक्त सहा केंद्र सुरू होते. १६ केंद्रांना मंजुरी दिली आहे. परंतु खरेदीला हवा तसा प्रतिसाद नसल्याने आणि गोदामे उपलब्ध न झाल्याने मागील महिन्यापर्यंत पूर्ण १६ खरेदी केंद्र सुरू होऊ शकले नाहीत. अमळनेर, रावेर व इतर चार केंद्रांमध्येच ज्वारी व मक्‍याची खरेदी होऊ शकली.

तूर खरेदीची नोंदणी सुरू करा तूर खरेदीसंबंधी शासनाने तातडीने नोंदणी सुरू करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. तुरीला बाजारात ५००० रुपयांपर्यंतचे देखील दर नाहीत. दर कमी असल्याने शासकीय खरेदी सुरू करावी लागेल. तूर मळणीस आणखी एक महिना अवधी आहे. मळणीनंतर लागलीच शेतकरी तुरीची विक्री करतील. त्यापूर्वीच नोंदणी करून खरेदीची तयारी केली तर शेतकऱ्यांना कमी दरात तुरीची विक्री करावी लागणार नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT