Narendra modi
Narendra modi  
मुख्य बातम्या

कृषीमध्ये स्टार्टअप, उद्योजकतेला प्रोत्साहन 

टीम अॅग्रोवन

नवी दिल्ली: नवीन तंत्रज्ञानाचा विकास आणि त्याचा कृषी तसेच संलग्न क्षेत्रात वापर वाढावा यासाठी स्टार्टअप आणि कृषी उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. तसेच शेतकऱ्यांना आवश्‍यक तेव्हा सल्ला देण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (ता. ४) देशातील कृषी शिक्षण, संशोधन आणि प्रसार याचा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला. या वेळी त्यांनी काही सूचना केल्या. ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी हवामान विभागाच्या गरजेनुसार वाण विकसित करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. तसेच शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळावे यासाठी हे प्रयत्न असेच सुरू राहण्याची गरज आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (आयसीएआर) गोवंश, मेंढ्या आणि बकऱ्यांच्या नवीन प्रजाती विकसित करण्याच्या कामाचा आढावा घेताना पंतप्रधान म्हणाले की, कुत्रे आणि घोड्याच्या देशी प्रजाती विकसित करण्यासाठी संशोधन आवश्‍यक आहे,’’ अशी माहिती प्रसिद्ध केलेल्या निवेदनातून देण्यात आली.  ‘‘शेतकऱ्यांना शेती अवजारे सुलभरीत्या उपलब्ध व्हावीत आणि शेतमालाची बांधावरून बाजारापर्यंत वाहतूक सुविधा मिळावी यासाठी कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण विभागाने किसान रथ ॲप आणले आहे. तसेच क्लस्टरवर आधारित सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीवर भर देण्याची गरज आहे. वर्षातून दोन वेळा हॅकथॉन आयोजित करून शेतीमधील समस्या पुढे येथील आणि त्यांची सोडवणूक करण्याचे उपायही मिळतील,’’ असे पंतप्रधान मोदी म्हणाले.  ‘‘आयसीएआर’ने भारताचा सेंद्रिय कर्बाचा भौगोलिक नकाशा तयार केला आहे. यातून सेेंद्रिय शेतीला प्रोत्साहन मिळेल अशी ८८ जैविक नियंत्रके आणि २२ जैविक कीडनाशकांची आढळली आहेत,’’ अशी माहिती निवेदनातून देण्यात आली  तृणधान्याचा प्रसार आवश्‍यक  नागरिकांनी आपल्या आहारात पौष्टिक अशा तृणधान्याचा वापर करावा यासाठी जनजागृती करणे गरजेचे आहे. ज्वारी, बाजरी, रागी आणि इतर दुर्मीळ होत असलेल्या तृणधान्यांचा वापर आहारात वाढवावा. तसेच शेती करताना पाण्याचा कार्यक्षम वापर व्हावा यासाठी जनजागृती हाती घ्यावी लागणार आहे. शेतकऱ्यांनी पाण्याचा काटेकोर वापर केल्यास सिंचनासाठी जास्त पाणी मिळेल, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.  गवत आणि चारा पिकांचाही अभ्यास व्हावा  पंतप्रधान मोदी म्हणाले की, पशुधनाच्या खाद्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी उपाय करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी गवत आणि स्थानिक चारा पिकांचा अभ्यास करून त्यांचे पौष्टिक मूल्य विचारात घ्यावे लागेल. तसेच सागरी शेवाळाचा अभ्यास करून त्याचे मृदा आरोग्यावर होणारे परिणाम समजून घ्यावे लागतील.  लाळ्या-खुरकूत लसीकरण राबवा  ‘आयसीएआर’च्या गोवंश, मेंढ्या आणि बकऱ्यांच्या नवीन प्रजाती विकसित करण्याच्या कामाचा आढावा पंतप्रधानांनी घेतला. या वेळी त्यांनी पशुधनाच्या लसीकरणाविषयीची माहिती जाणून घेतली. ‘‘पशुधनाच्या लाळ्या-खुरकूत लसीकरणावर भर द्यावा. लसीकरण पूर्ण करण्यासाठी मिशन मोडवर काम करावे,’’ अशा सूचना पंतप्रधान मोदी यांनी केल्या.  पंतप्रधान मोदी म्हणाले... 

  • कुत्रे आणि घोड्याच्या देशी प्रजातींसाठी संशोधन आवश्‍यक 
  • क्लस्टरवर आधारित सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीवर भर 
  • हॅकथॉनमधून शेतीमधील समस्या आणि उपाय पुढे येतील 
  • सागरी शेवाळाचा मृदा आरोग्यावर होणारा परिणाम अभ्यासावा 
  • पशुधानाचे लसीकरण मिशन मोडवर राबवा 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

    Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

    Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

    Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

    Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

    SCROLL FOR NEXT