Let the Central and State Governments come to their senses regarding milk prices 
मुख्य बातम्या

दुध दरांबाबत केंद्र, राज्य सरकारला सदबुद्धी येवो

वडीगोद्री, जि. जालना : राज्य सरकारला दुध दरवाढीचा निर्णय घेण्याची व केंद्र सरकारला दूध पावडर आयातीचा निर्णय रद्द करून दूध पावडर निर्यातीसाठी ३० रुपये प्रति किलो निर्यात अनुदान जाहीर करण्याची सूदबुद्धी येवो.

टीम अॅग्रोवन

वडीगोद्री, जि. जालना : राज्य सरकारला दुध दरवाढीचा निर्णय घेण्याची व केंद्र सरकारला दूध पावडर आयातीचा निर्णय रद्द करून दूध पावडर निर्यातीसाठी ३० रुपये प्रति किलो निर्यात अनुदान जाहीर करण्याची सूदबुद्धी येवो, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारी (ता. २०) वडीगोद्री येथील ग्रामदेवतेला प्रतिकात्मक दुग्धाभिषेक करण्यात आला. 

अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे महादेवाला दुग्धाभिषेक घालून दूध बंद आंदोलनाची सुरवात करण्यात आली. केंद्र शासनाने २३ जूनचा १० हजार टन दूध पावडर आयात करण्याचा निर्णय त्वरित रद्द करावा, ३० हजार टन दूध पावडरचा बफर स्टॉक करावा, तसेच निर्यात अनुदान प्रति किलो ३० रूपये देण्यात यावे, दूध पावडर, तूप, बटर व इतर दुग्धजन्य पदार्थावरील जीएसटी पूर्णपणे रद्द करावा, पुढील तीन महिन्यासाठी राज्य सरकारने थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रतिलिटर ५ रूपये अनुदान जमा करावे, आदी मागण्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे करण्यात आल्या. 

शेतकऱ्यांनी २१ जुलै रोजी एक दिवस दूध संकलन करू नये. सोशल डिस्टन्स पाळून शांततेने कायदा सुव्यवस्थेला बाधा न येता आंदोलन करायचे आहे. तसेच या आंदोलनामध्ये सर्व शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा, तसेच जनजागृती करावी. गोरगरीबांनी दुधाची नासाडी करू नये, असे आवाहन जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी केले.   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement: आधारभूत किमतीने सोयाबीन खरेदीची गती संथ

Dairy Development: दुग्धविकास प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू

Lower Dudhana Project: निम्म दुधना प्रकल्पातून रब्बीसाठी ४ आवर्तने

Teacher Support: शिक्षकांच्या अडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध

Agri Product Storage: शेतीमाल साठवणुकीसाठी सुधारित पद्धती

SCROLL FOR NEXT