साताऱ्यात गाळप हंगामाची तयारी अंतिम टप्प्यात
साताऱ्यात गाळप हंगामाची तयारी अंतिम टप्प्यात 
मुख्य बातम्या

साताऱ्यात गाळप हंगामाची तयारी अंतिम टप्प्यात

टीम अॅग्रोवन

सातारा ः ऊस गाळप हंगामाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, कारखान्यांचे कर्मचारी साखर उतारा पाहण्यासाठी ऊस घेऊन जात आहेत. ऊस तोडणीसाठी गावागावात मजूर उपस्थित झाले आहे. दिवाळीच्या दरम्यान जिल्ह्यात अनेक कारखाने प्रत्यक्ष हंगाम सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्यात या हंगामात १७ साखर कारखान्यांकडून गाळप होईल, असा अंदाज आहे. या कारखान्यापैकी अनेक कारखान्यांचे बॅायलर प्रदीपन झाले असून, साखर उताऱ्यासाठी उसाचे नुमने घेण्याचे काम वेगात सुरू आहे. जिल्ह्यात या गाळप हंगामासाठी ८० हजार हेक्टर क्षेत्रावर ऊस उपलब्ध असल्याने गाळप हंगाम लांबण्याची शक्यता आहे. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत कारखान्यांची संख्या तीनने वाढली आहे. यामुळे कोणत्या कारखान्याचे किती ऊस मिळेल हे हंगामात स्पष्ट होणार आहे. जास्तीत जास्त ऊस वेळेत येण्यासाठी ऊसतोड मजुरांची भूमिका महत्त्वाची असल्याने क्षमता मोठी असलेल्या कारखान्यांनी जून महिन्यापासून करारावर लक्ष दिले आहे. सध्या मजूर दाखल होऊ लागले आहेत.

गावागावात राहुट्या उभारणीच्या कामात व्यस्त असलेल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. कर्नाटक राज्याच्या विविध भागांतून मजूर आणले जात आहेत. तसेच अनेक कारखान्यांनी ऊसतोडणीसाठी मशिनची खरेदी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी मशिन खरेदी करता यावी यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेने पुढाकार घेतल्याने मशिनच्या संख्येत वाढ झाली आहे. या हंगामाच्या सुरवातीपासून मशिनद्वारे ऊसतोड केली जाणार आहे.   

दिवाळी गोड होणार का? गतवर्षी १४ कारखान्यांनी ८९ लाख टनांवर उसाचे गाळप केले आहे. या हंगामाच्या सुरवातीस साखरेचे दर चांगले असल्याने एफआरपीपेक्षा जास्त दर दिला होता. काही कारखान्यांनी तीन हजार दर जाहीर केला होता. मात्र, त्यानंतर साखरेचे दर कमी झाल्याने सर्वच कारखान्यांकडून दर कमी करण्यात आला होता. हंगामच्या अंतिम टप्प्यात एफआरपी रक्कम पूर्ण केली होती. दर जाहीर केल्याप्रमाणे दर देऊन दिवाळी गोड करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT