Large loss of paddy crop in Nashik due to untimely 
मुख्य बातम्या

नाशिकमध्ये अवकाळीमुळे भात पिकांचे मोठे नुकसान

नाशिक : ऐन दिवाळीच्या सणाला हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार शुक्रवारी (ता.५) व शनिवारी (ता.६) जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

टीम अॅग्रोवन

नाशिक : ऐन दिवाळीच्या सणाला हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार शुक्रवारी (ता.५) व शनिवारी (ता.६) जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. प्रामुख्याने जिल्ह्यातील इगतपुरी, सिन्नर व नाशिक तालुक्यासह पश्चिम पट्ट्यातील भात, सोयाबीन आणि भाजीपाला पिकांना पावसाचा तडाखा बसला. त्यामुळे ऐन आनंदाच्या सणाला बळीराजाच्या कष्टावर पाणी फिरले आहे.

जिल्ह्याच्या पश्चिम भागातील भात उत्पादक पट्ट्यात भाताच्या सोंगणीच्या कामांना वेग आला आहे. त्यामध्ये काही शेतकऱ्यांनी भात सोंगणी करून पेंढ्या जमा करून शेतात ठेवल्या होत्या. मात्र पावसामुळे त्या पाण्यात भिजल्या. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान वाढले. त्यामुळे खळ्यावर तसेच शेतात ठेवलेला भात झोडणी अगोदरच मातीमोल झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.  इगतपुरी, सिन्नर व नाशिक तालुक्यात अनेक भागात जोरदार पाऊस झाला. यात प्रामुख्याने भाताच्या पेंढ्या पाण्याखाली गेल्या होत्या. या पिकाशिवाय टोमॅटो, मिरची, काकडी, फ्लॉवरसह पालेभाजीवर्गीय पिकांचे नुकसान झाले. टोमॅटो पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. 

इगतपुरीच्या पूर्व भागात शुक्रवार (ता. ६) सायंकाळनंतर मेघगर्जनेसह तासभर झालेल्या अवकाळी पावसामुळे भात पिकासह भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. 

दोन दिवस झालेल्या पावसामुळे भात पिकाचे खूपच नुकसान झाले. सोंगूण ठेवलेल्या भातावर पाऊस पडल्याने भाताचे दाणे गळून पडण्याची भीती आहे. शेतकरी हवालदिल झाला. प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी. - वसंत भोसले, भात उत्पादक, धामणी, ता. इगतपुरी.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tree Plantation: नाशिकमध्ये एक लाख वृक्ष लागवडीचा संकल्प

Power Supply Issue: वीज कपातीमुळे पिके धोक्यात; संतप्त शेतकऱ्यांचा महावितरणवर धडक मोर्चा

Farm Loan Waiver: कर्जमाफीसाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी आवश्यक

Crop Damage Compensation: कोकणातील १ लाख ३४ हजार शेतकऱ्यांना दिलासा; २०९ कोटी मदत मंजूर, शासन निर्णय जारी

Nashik Rain Update: नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी

SCROLL FOR NEXT