ग्रेडर नसल्याने तूर खरेदी रखडली
ग्रेडर नसल्याने तूर खरेदी रखडली 
मुख्य बातम्या

परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात ग्रेडर नसल्याने तूर खरेदी रखडली

टीम अॅग्रोवन

परभणी : परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील हमीभाव खरेदी केंद्रावर नियुक्त करण्यात आलेले ग्रेडर रुजू न झाल्यामुळे ११ केंद्रांवर अद्याप तूर खरेदी सुरू झालेली नाही. हमीभावाने तूर विक्रीसाठी तीन जिल्ह्यांतील १७ हजार ३९६ शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली असून, केंद्र सुरू न झालेल्या भागातील शेतकरी खरेदी केंद्रावर तूर घेऊन येण्याच्या संदेशाची वाट पाहात आहेत. दरम्यान, सोमवारपर्यंत (ता.५) नांदेड जिल्ह्यात ५२५ क्विंटल ,तर सेनगाव (जि. हिंगोली) येथे २२० क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या किंमत समर्थन योजनेअंतर्गत आधारभूत किंमत दराने नांदेड जिल्ह्यात नांदेड (अर्धापूर), हादगाव, किनवट, भोकर, नायगाव, बिलोली, देगलूर, मुखेड, लोहा या नऊ ठिकाणी नाफेडच्या तूर खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली. परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, सेलू, गंगाखेड, पूर्णा, बोरी या सहा ठिकाणी नाफेडतर्फे, तर मानवत येथे विदर्भ कोसआॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनतर्फे तूर खरेदी केली जाणार आहे. हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, वसमत, जवळा बाजार या पाच ठिकाणी नाफेडतर्फे तूर खरेदी केली जाणार आहे. या ठिकाणी खरेदी केंद्र सुरू करण्याबाबतचे आदेश जिल्हा विपणन अधिकारी कार्यालयाकडून संबंधित एजन्सींना देण्यात आले आहेत. या केंद्रावर नाफेडतर्फे ग्रेडरच्या नियुक्त्यादेखील करण्यात आल्या आहेत, परंतु आजवर ग्रेडर रुजू न झाल्यामुळे परभणी जिल्ह्यातील खरेदी केंद्रे सुरू झाला नाहीत. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव येथील केंद्र सुरू झाले असून तेथे सोमवारपर्यंत (ता.५) २१ शेतकऱ्यांची २२० क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. अन्य ठिकाणी अद्याप खरेदीस सुरवात नाही, असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT