hasan-mushrif
hasan-mushrif  
मुख्य बातम्या

कोल्हापूर जिल्हा परिषदेला अत्युत्कृष्ट पुरस्कार : हसन मुश्रीफ

टीम अॅग्रोवन

मुंबई : यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्हा परिषदेने राज्यस्तरीय अत्युत्कृष्ट जिल्हा परिषदेचा प्रथम पुरस्कार पटकावला असून, यवतमाळ जिल्हा परिषदेने द्वितीय आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. 

यशवंत पंचायत राज अभियान सन २०२०-२१ (मूल्यांकन वर्ष २०१९-२०) अंतर्गत हे पुरस्कार आहेत. दरवर्षी यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मदिनी १२ मार्च रोजी या पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. पण कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यंदा या दिवशी हा कार्यक्रम होणार नाही. 

राज्यस्तरीय अत्युत्कृष्ट पंचायत समितीमध्ये प्रथम क्रमांक कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) पंचायत समितीने पटकावला. कागल (जि. कोल्हापूर) पंचायत समितीने द्वितीय, तर भंडारा (जि. भंडारा) पंचायत समितीने तृतीय क्रमांक पटकावला. या पंचायत समित्यांसाठी अनुक्रमे २० लाख रुपये, १७ लाख रुपये आणि १५ लाख रुपये, तसेच स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. 

मंत्री मुश्रीफ म्हणाले, की पंचायत राज संस्थांना त्यांनी केलेल्या कामगिरीनुसार प्रोत्साहित करून त्यांची कार्यक्षमता अधिक वाढविणे व त्यांच्यामध्ये उत्कृष्ट कामांची स्पर्धा निर्माण करणे आवश्यक आहे. यासाठी राज्यात पंचायत राज संस्थांचे व्यवस्थापन व विकास कार्यात अत्युत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांना विभागस्तर व राज्यस्तरावर ‘यशवंत पंचायत राज अभियान’ पुरस्कार देण्यात येतात. 

पंचायत समित्यांना प्रत्येक विभागात अनुक्रमे ११ लाख रुपये, ८ लाख रुपये आणि ६ लाख रुपये, तसेच स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र वितरित करण्यात येईल.  विभागस्तरीय पुरस्कार पुढीलप्रमाणे (अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय)  कोकण विभाग ः कुडाळ (जि. सिंधुदुर्ग), मालवण (जि. सिंधुदुर्ग), सुधागड-पाली (जि. रायगड)  नाशिक विभाग ः राहाता (जि. नगर), नाशिक (जि. नाशिक), कळवण (जि. नाशिक)  पुणे विभाग ः कागल (जि. कोल्हापूर), गडहिंग्लज (जि. कोल्हापूर), माढा/कुर्डुवाडी (जि. सोलापूर)  औरंगाबाद विभाग ः लातूर (जि. लातूर), नांदेड (जि. नांदेड), शिरूर अनंतपाळ  अमरावती विभाग ः अचलपूर (जि. अमरावती), दर्यापूर (जि. अमरावती), राळेगाव (जि. यवतमाळ)  नागपूर विभाग ः भंडारा (जि. भंडारा), पोभुर्णा (जि. चंद्रपूर), कामठी (जि. नागपूर)  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande : अविरत कर्मयोगी

Wheat Market : विदर्भात गव्हाच्या दरात चढ-उतार

Cotton Productivity : परभणी जिल्ह्यात कापूस रुईचा उतारा हेक्टरी ३ क्विंटल ९८ किलो

Water Scarcity : करकंब परिसरात द्राक्षबागांना टँकरने पाणी

Dam Water Stock : देशातील मोठी ७ धरणे कोरडी

SCROLL FOR NEXT